“प्रकाश आंबेडकरांनी MIMसोबत युती करावी, आमची दारे उघडी आहेत”: इम्तियाज जलील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 08:39 AM2024-03-30T08:39:39+5:302024-03-30T08:41:31+5:30

AIMIM Imtiaz Jaleel: प्रकाश आंबेडकरांनी किंगमेकर होण्यासाठी एमआयएमसोबत युती करावी, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

imtiaz jaleel said that prakash ambedkar should alliance with aimim party our doors are open | “प्रकाश आंबेडकरांनी MIMसोबत युती करावी, आमची दारे उघडी आहेत”: इम्तियाज जलील

“प्रकाश आंबेडकरांनी MIMसोबत युती करावी, आमची दारे उघडी आहेत”: इम्तियाज जलील

AIMIM Imtiaz Jaleel: लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत सामील होण्यासाठी आवाहन करताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या ८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात सारे काही आलबेल नसल्याचे चित्र असून, यावरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकरांना युती करण्याचे आवाहन केले आहे. 

मीडियाशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, एमआयएम महाराष्ट्रात इतर पक्षातील चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. आम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत आहोत की, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार आहे. कुणाला उमेदवारी मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाची यादी अजून फायनल झालेली नाही. आम्ही सहा जागा लढवण्याचा ठरवले होते. मात्र आता आणखी इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या सगळ्याचा एकत्रित डेटा आणि इच्छुकांची यादी घेऊन असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेणार आहे, असे जलील यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत युती करावी

प्रकाश आंबेडकरांनी किंगमेकर होण्यासाठी एमआयएमसोबत युती करावी. प्रकाश आंबेडकरांसाठी आमची दारे खिडक्या सगळे उघडे आहे, असे आवाहन जलील यांनी केले. एखाद्या पक्षाचे चांगले उमेदवार असल्यास त्याला आम्ही पाठिंबा देणार आहोत. तो कोणत्याही पक्षाचे उमेदवार असू द्या. ते आम्हाला मानत नसले तरी पण ते चांगले उमेदवार असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करत आहोत, असे जलील यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: imtiaz jaleel said that prakash ambedkar should alliance with aimim party our doors are open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.