आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 09:23 IST2026-01-03T09:21:18+5:302026-01-03T09:23:43+5:30
'महायुती' असो वा 'महाविकास आघाडी', स्थानिक पातळीवर मित्रपक्षांनीच एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याने यंदाची निवडणूक ही 'सर्व विरुद्ध सर्व' अशीच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी प्रमुख महापालिकांत थेट दोनपेक्षा अधिक आघाड्यांमध्ये लढत होणार आहे.

आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
मुंबई : २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता युती आणि आघाड्यांचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. 'महायुती' असो वा 'महाविकास आघाडी', स्थानिक पातळीवर मित्रपक्षांनीच एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याने यंदाची निवडणूक ही 'सर्व विरुद्ध सर्व' अशीच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी प्रमुख महापालिकांत थेट दोनपेक्षा अधिक आघाड्यांमध्ये लढत होणार आहे.
कोणत्या विभागात नेमके काय झाले?
नाशिक विभागात गटबाजीचा उच्चांक -
नाशिक : भाजप स्वबळावर. शिंदेसेना–राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र. तर महाविकास आघाडी + मनसे एकत्र. येथे गटबाजीचा मोठा उद्रेक.
मालेगाव : एमआयएम, मालेगाव सेक्युलर फ्रंट, भाजप, शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहेत.
सर्वाधिक विखुरलेली राजकीय लढत येथे होत आहे.
अहिल्यानगर : भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार) युती. शिंदेसेना स्वतंत्र.
काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार)–उद्धवसेना एकत्र आले आहेत.
युती असूनही तिहेरी संघर्ष.
जळगाव : भाजप–शिंदेसेना एकत्र. उरलेले पक्ष स्वतंत्र लढत आहेत. मर्यादित पण बंडखोरी झाली आहे.
धुळे : भाजप विरुद्ध शिंदेसेना–राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध उद्धवसेना–राष्ट्रवादी (शरद पवार)–काँग्रेस–मनसे
आघाडी विस्कळीत.
पुणे विभागात आघाड्यांचा गोंधळ शिगेला
पुणे : भाजप स्वतंत्र. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. काँग्रेस–उद्धवसेना–मनसे एकत्र. शिंदेसेना स्वतंत्र.
चार आघाड्या, बंडखोरी आहे.
पिंपरी–चिंचवड : भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी तर शिंदेसेना विरुद्ध काँग्रेस–उद्धवसेना–मनसे
सर्वाधिक फाटाफूट आहे.
सोलापूर : भाजप विरुद्ध शिंदेसेना–राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध महाविकास आघाडी
कोल्हापूर : भाजप–शिंदेसेना–राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र. काँग्रेस–उद्धवसेना विरुद्ध
आघाडी झाली असली तरी स्थानिक पातळीवर बंडखोरी.
इचलकरंजी : महायुती विरुद्ध शिव-शाहू आघाडी
स्थानिक पातळीवर स्वतंत्र आघाड्यांची उभारणी.
सांगली–मिरज–कुपवाड : भाजप विरुद्ध काँग्रेस–राष्ट्रवादी (शरद पवार), विरुद्ध शिंदेसेना, विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार)
विरुद्ध तिसरी आघाडी
पाच बाजूंनी लढत, बंडखोरीचा येथे झाला आहे कळस.
कोकण विभाग -
सर्वाधिक बंडखोरी, आघाड्यांची पूर्ण मोडतोड
मुंबई : तीन आघाड्या थेट समोरासमोर आहेत.
भाजप–शिंदेसेना × उद्धवसेना–मनसे × काँग्रेस–वंचित
कोणतीही आघाडी एकत्र न लढल्याने समन्वयाचा पूर्ण अभाव.
बंडखोरीचा परिणाम म्हणून सर्व प्रभागांत बहुपक्षीय लढती.
२२७ जागांसाठी १,७२९ उमेदवार रिंगणात आहेत.
ठाणे : शिंदेसेनेचा बालेकिल्ला असतानाही भाजप स्वतंत्रपणे रिंगणात.
उद्धवसेना, मनसे, काँग्रेस स्वतंत्र.
राष्ट्रवादी (शरद पवार) व राष्ट्रवादी (अजित पवार) आमनेसामने.
एकूण जागा १३१ असून ६४९ उमेदवार रिंगणात आहेत ७ जण बिनविरोध निवडून आले आहेत.
नवी मुंबई : १११ जागांसाठी तब्बल ४९९ उमेदवार मैदानात असून एकही बिनविरोध नाही
थेट भाजप विरुद्ध शिंदेसेना असा सामना.
युती असूनही स्थानिक पातळीवर समन्वय नाही.
बंडखोरीमुळे फटका बसणार.
उल्हासनगर : भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, वंचित सर्व स्वतंत्र.
७८ जागांसाठी ४३२ उमेदवार रिंगणात.
कोणतीही युती प्रत्यक्षात नाही.
एकही बिनविरोध नाही.
कल्याण–डोंबिवली : भाजप–शिंदेसेना एकत्र, पण राष्ट्रवादी (अजित पवार) स्वबळावर,
उद्धवसेना–मनसे वेगळी तर काँग्रेस स्वतंत्र लढत आहे.
आघाड्यांमध्ये बंडखोरी.
भिवंडी : भाजप–शिंदेसेना विरुद्ध काँग्रेस स्वतंत्र, सप स्वतंत्र
कोणताही समन्वय नाही.
मिरा–भाईंदर : भाजप विरुद्ध शिंदेसेना थेट संघर्ष. उर्वरित सर्व पक्ष स्वतंत्र लढत आहेत.
युती कागदावर, मैदानात संघर्ष.
वसई–विरार : बविआ स्वतंत्र ताकद म्हणून मैदानात.
भाजप–शिंदेसेना एकीकडे, उद्धवसेना वेगळी.
तिरंगी लढत.
पनवेल : भाजप–शिंदेसेना विरुद्ध महाविकास आघाडी + इतर पक्ष.
आघाड्यांचे पुनर्रचना स्वरूप, पण अंतर्गत मतभेद कायम.
अमरावती विभाग -
अमरावती : भाजप, शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, बसप, वंचित, एमआयएम – सर्व स्वतंत्र.
बहुपक्षीय संघर्ष आहे.
अकोला : भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध, शिंदेसेना–काँग्रेस–राष्ट्रवादी (शरद पवार) – उद्धवसेना –वंचित–एमआयएम
नागपूर विभाग
नागपूर : भाजप–शिंदेसेना विरुद्ध काँग्रेस, इतर गट स्वतंत्र
बहुपक्षीय संघर्ष.
चंद्रपूर : भाजप–शिंदेसेना, विरुद्ध उद्धवसेना–वंचित, विरुद्ध काँग्रेस
तिहेरी बंडखोरी.
छत्रपती संभाजीनगर विभाग -
छत्रपती संभाजीनगर : भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना स्वतंत्र. काँग्रेस विरुद्ध एमआयएम.
विस्कळीत चित्र.
नांदेड : भाजप + शिंदेसेना, काँग्रेस–वंचित
परभणी : राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध उद्धवसेना–काँग्रेस
आघाडी तुटलेली.
जालना : सर्व पक्ष स्वतंत्र. सर्वच जागांवर थेट बहुपक्षीय संघर्ष.
लातूर : भाजप विरुद्ध काँग्रेस–वंचित.
दोन गट, पण आघाड्यांचा अभाव.
बंडखोरी आणि युतीमधील बिघाडी काय सांगते?
मिरा-भाईंदर, नवी मुंबई, आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेसेना असा थेट सामना आहे. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढत आहे, तर त्यांच्या विरोधात शिंदेसेना आणि अजित पवार गट एकत्र आहेत.
महाविकास आघाडीतील फाटाफूट कुठे?
अनेक ठिकाणी काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार गट वेगवेगळे लढत आहेत. सांगलीत उद्धवसेना आणि मनसे 'तिसरी आघाडी' करून काँग्रेस-शरद पवार गटाच्या विरोधात उभे आहेत. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी-भाजप युती विरुद्ध शिंदेसेना विरुद्ध मविआ असा विचित्र त्रिकोण पाहायला मिळत आहे.