काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 09:02 PM2024-11-30T21:02:42+5:302024-11-30T21:04:17+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे यांची प्रकृती कालपासून चांगली नव्हती. त्यांच्यावर आता उपचार सुरू केले आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

eknath shinde health update given by doctor and suffer from fever cold and throat infection | काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...

काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार, याबाबत स्पष्टता आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएम मशीनवरून टीकास्त्र सोडत आहेत. अशातच आपल्या गावी केलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. 

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे. त्यांच्या शरीराचे तापमान हे १०४° असून, उपचार सुरू असल्याचे समजते आहे. तसेच प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे आज बाहेर पडले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट

डॉ. आर. एम. पार्टे हे एकनाथ शिंदे यांच्यावर उपचार करत आहेत. या डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. पत्रकारांशी बोलताना डॉक्टर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना ताप येत आहे, सर्दी आहे, घशाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरू केले आहेत. सलाइन लावले आहे. आयव्ही लावला आहे. त्यांना एक दोन दिवसांत बरे वाटले याची खात्री आहे. कालपासून त्यांची प्रकृती चांगली नव्हती. आता प्रकृती चांगली आहे. आता आमच्याशी गप्पा मारत होते. उद्या ते मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती डॉक्टर पार्टे यांनी दिली. 

दरम्यान, महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या. बैठकांचे सत्र सुरू झाले. एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी, अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. त्यानंतर परत आल्यावर एकनाथ शिंदे गावी निघून गेले. एकनाथ शिंदे दरे गावी पोहोचल्याचे कळताच आजूबाजूच्या गावातील, जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते भेट घेण्यासाठी आले होते. पण, एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट नाकारली. एकनाथ शिंदे आजारी असून, वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे सांगत अनेकांच्या भेटी नाकारण्यात आल्या. शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला त्यांच्या दरे या गावी आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावे लागले.

Web Title: eknath shinde health update given by doctor and suffer from fever cold and throat infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.