माझ्या वडिलांनी केलेली कामं, मी केली असं म्हणायचं का? संजय मंडलिकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 02:05 PM2024-04-21T14:05:11+5:302024-04-21T14:17:06+5:30

Sanjay Mandlik : मी याआधी निवडणुका लढवल्या आहेत. मी सहकारांमध्येही काम करत आहे, असे संजय मंडलिक यांनी सांगितले.

Do you mean that I have done the works done by my father? Question by Sanjay Mandlik, Kolhapur Lok Sabha Election 2024 | माझ्या वडिलांनी केलेली कामं, मी केली असं म्हणायचं का? संजय मंडलिकांचा सवाल

माझ्या वडिलांनी केलेली कामं, मी केली असं म्हणायचं का? संजय मंडलिकांचा सवाल

Sanjay Mandlik, Kolhapur Lok Sabha Election 2024 : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीबद्दल आदरच आहे. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात टीका टिप्पणी होणार आहे. विरोधकांना लोकशाही हवी आहे की, नाही कळत नाही. उमेदवारांने काय केले म्हणून मला ट्रोलिंग केले जाते. पण मी त्याला उत्तर देत आहे. तसेच, राजर्षी शाहू महाराजांनी केलेली कामं मी केली असं म्हणण्यात अर्थ नाही. तसं असेल तर मग माझ्या वडिलांनी केलेली कामं, मी केली असं म्हणायचं का? असा सवाल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी उपस्थित केला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी रविवारी टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी निवडणुकीत आपल्या विजयाचा विश्वास संजय मंडलिक यांनी व्यक्त केला आहे. तसेच, आमचा प्रचार आधीपासूनच सुरू झाला आहे. शिवसेनेच्या प्रथेनुसार कोटी तीर्थ स्वामी समर्थ मंदिरातून अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात करत आहोत. माझा दिवसभर दौरा असेलच पण महायुतीचे सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. कोल्हापूर शहर हे हिंदुत्ववादी विचाराचे शहर आहे. त्यामुळे 2009 ची पुनरावृत्ती होऊन अधिक लीडने मते मिळतील, असे संजय मंडलिक म्हणाले.

दुसरीकडे, कोल्हापूरात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचाराची मुख्य धुरा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यावर आहे. यावरून संजय मंडलिक यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मला कळत नाही उमेदवार सतेज पाटील आहेत की आणखी कोण आहेत. सतेज पाटील उमेदवार असते तर मी त्यांच्यावर बोललो असतो. आता महाराजांवर बोलतोय तर म्हणतायेत गादीचा अपमान होतोय, तर आम्ही काय करायचे आता राजेशाही शिल्लक राहिलेली नाही, असे संजय मंडलिक यांनी सांगितले.

याचबरोबर, सतेज पाटील यांना त्यांनी प्रवक्ता म्हणून नेमला आहे का? मला माहित नाही. तसे असेल तर त्यांना उत्तर माझे प्रवक्ते देतील. कालबाह्य विषयावर निवडणुकीत चर्चा व्हायला नको. स्वतःहून केलेली काही काम असतील तर त्यांनी सांगावी, मी त्यांचे अभिनंदनच करेन. तसेच, मी याआधी निवडणुका लढवल्या आहेत. मी सहकारांमध्येही काम करत आहे, असे संजय मंडलिक यांनी सांगितले. याशिवाय, संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी सुद्धा भाष्य केले. आजपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नेते होते. आता मात्र कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला आहे. कोल्हापूरच्या अनेक संकटात एकनाथ शिंदे धावून आले आहेत. कार्यकर्त्याला ताकद द्यायची हा एकनाथ शिंदे यांचा स्वभावच आहे, असे संजय मंडलिक म्हणाले.
 

Web Title: Do you mean that I have done the works done by my father? Question by Sanjay Mandlik, Kolhapur Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.