"निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु..."; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:20 IST2026-01-15T12:19:19+5:302026-01-15T12:20:18+5:30
Devendra Fadnavis on marker pen ink for voting: मतदानावेळी वापरण्यात येणाऱ्या मार्करच्या शाईवरून वादाला फुटलं तोंड

"निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु..."; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला
Devendra Fadnavis on marker pen ink for voting: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हे मतदान सुरु असणार आहे. राज्यातील सर्व बडे नेते मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरमध्ये महानगरपालिकेसाठी मतदान केले. यावेळी त्यांची पत्नी अमृता फडणवीस देखील सोबत होत्या. मतदानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मतदानात मार्करने शाई लावण्याच्या वादावर भाष्य केले.
मतदानावेळी मार्कर पेन वापरण्यावरून...
"या सर्व गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतात याआधीही अनेक वेळा मार्कर पेन वापरण्यात आला आहे जर कोणी याबाबत आक्षेप घेत असेल तर इलेक्शन कमिशन ने या संदर्भात लक्ष दिले पाहिजे पण मला असं वाटतं की काही लोक उद्याच्या निकालाचा अंदाज लावून आजपासूनच काही गोष्टींवर मुद्दाम भाष्य करत आहेत. उद्याचा निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करत आहेत हे यातून स्पष्ट दिसून येत आहेत," असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला.
"मतदान हा लोकशाहीचा आहे. सर्वांनी मतदान केलेच पाहिजे. मतदान हे केवळ अधिकार नव्हे तर कर्तव्य आहे. मतदान न करणे हा लोकशाहीचा अपमान आहे. आमचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर काँग्रेसकडून भ्याड हल्ला झाला. निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करणे हा वाईट आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.