Municipal Elections: "बिनविरोध निवड म्हणजे लोकशाहीची हत्या" काँग्रेसची भाजपवर बोचरी टीका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 21:00 IST2026-01-03T20:59:17+5:302026-01-03T21:00:13+5:30
Maharashtra Municipal Corporation Election: काँग्रेस नेते अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत गंभीर आरोप करत भाजप 'साम, दाम, दंड, भेदा'चा वापर करून लोकशाहीची हत्या करत असल्याची टीका केली .

Municipal Elections: "बिनविरोध निवड म्हणजे लोकशाहीची हत्या" काँग्रेसची भाजपवर बोचरी टीका!
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना धार चढली आहे. काँग्रेस नेते अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत गंभीर आरोप करत भाजप 'साम, दाम, दंड, भेदा'चा वापर करून लोकशाहीची हत्या करत असल्याची टीका केली . 'निवडणूक आयोग ही भाजपची शाखा झाली आहे का?' असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा दाखला देत सावंत म्हणाले की, "शंभर ठिकाणी भाजपने ज्या पद्धतीने उमेदवार बिनविरोध निवडून आणले, ते लोकशाहीसाठी मोठे संकट आहे. संविधानाने प्रत्येक मतदाराला आपले नेतृत्व निवडण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, विरोधकांना रिंगणातून हटवून मतदारांचा हा अधिकार हिरावून घेतला जात आहे. आपले नेतृत्व कोणी करावे? हे मतदारांनी ठरवायचे असते, पण भाजप कुटील कारस्थान करून लोकांची निवड करण्याची संधीच संपवत आहे. हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीसाठी दुर्दैवी आहे," असेही सावंत यांनी नमूद केले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेवर सावंतांनी संशय व्यक्त केला आहे. नियमानुसार अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत असते. मात्र, अनेक ठिकाणी ही प्रक्रिया रात्रभर सुरू होती आणि कागदोपत्री ती ३ वाजेपर्यंतच झाल्याचे दाखवण्यात आले, असा खळबळजनक दावा सावंतांनी केला आहे. या वाढीव वेळेत विरोधी उमेदवारांवर प्रचंड दबाव टाकून आणि मोठ्या ऑफर्स देऊन त्यांना माघार घेण्यास भाग पाडले गेले, असा आरोप त्यांनी केला.
अरविंद सावंत यांनी थेट निवडणूक आयोगावरच निशाणा साधला. "निवडणूक आयोग आज भाजपची शाखा झाली आहे की काय, असा प्रश्न पडतोय. ज्यांच्यावर संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, तेच भाजपच्या दबावाखाली काम करत आहेत.