बल्‍लारपूर रेल्वे पूल दुर्घटना: मृताच्‍या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 04:19 PM2022-11-28T16:19:25+5:302022-11-28T16:20:05+5:30

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी केली मान्‍य

Ballarpur railway bridge accident 5 lakhs announced for the families of the deceased | बल्‍लारपूर रेल्वे पूल दुर्घटना: मृताच्‍या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

बल्‍लारपूर रेल्वे पूल दुर्घटना: मृताच्‍या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Next

न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचा दावा महाव्यवस्थापकांनी केला. पण त्याच दरम्यान दोन दिवसांपूर्वी चंद्रपूरजवळचा बल्लारपूररेल्वेस्थानकावरील ओव्हरब्रीज कोसळला. या दुर्घटनेत १५-२० जण जखमी झाले. बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्‍या कुटुबीयांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. त्‍याचप्रमाणे जखमींवर योग्‍य उपचार शासकीय खर्चाने करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत.

रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला भेट दिली व सामान्‍य रुग्‍णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस देखील केली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याशी संपर्क साधुन मृताच्‍या कुटुंबीयांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांचे अर्थसहाय्य प्रदान करण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार मुख्‍यमंत्र्यांनी ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे ही घटना घडली. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे फूटओवर ब्रिजचा स्लॅब कोसळला. प्रवासी चालत जात असताना अचानक एक स्लॅब कोसळून दहा प्रवासी जखमी झाले. बल्लारपूर येथे काजीपेठ ही पॅसेंजर रेल्वे स्थानकावर येणार असल्याने जाणाऱ्या या रेल्वेतून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती. या दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या महितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे फूटओवर ब्रिजचा स्लॅब कोसळला. प्रवासी चालत जात असताना अचानक एक स्लॅब कोसळून १५ ते २० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

Web Title: Ballarpur railway bridge accident 5 lakhs announced for the families of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.