राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:17 IST2025-12-25T18:16:12+5:302025-12-25T18:17:15+5:30

Ajit Pawar NCP Star Campaigner List: स्टार प्रचारकांची ४० जणांची यादी जाहीर केली

ajit pawar ncp announces list of 40 star campaigners for upcoming municipal elections mumbai bmc | राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले

Ajit Pawar NCP Star Campaigner List: राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांची कंबर कसून तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar NCP) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर केली. महापालिकांच्या सत्तासंघर्षात विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी पक्षाने अनुभवी आणि मोठ्या नेत्यांची तगडी फौज मैदानात उतरवली आहे. पक्षाची धोरणे आणि विकासकामे जनतेच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही टीम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार आणि आक्रमक प्रवक्ते यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवर जनसंपर्क असलेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही या यादीत स्थान देण्यात आले. निवडणूक प्रचार अधिक प्रभावी आणि व्यापक व्हावा, या उद्देशाने पक्षाने आपल्या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. विविध आरोप झालेले धनंजय मुंडे आणि नवाब मलिक दोघांचाही यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र नुकतेच मंत्रिपदावरून हकालपट्टी झालेल्या माणिकराव कोकाटेंना वगळण्यात आले आहे. 

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारकांची नावे-

१. अजित पवार
२. प्रफुल पटेल
३. सुनील तटकरे
४. हसन मुश्रीफ
५. धनंजय मुंडे
६. नरहरी झिरवाळ
७. बाबासाहेब पाटील
८. मकरंद जाधव-पाटील
९. दत्तात्रय भरणे
१०. अण्णा बनसोडे
११. अदिती तटकरे
१२. इंद्रनील नाईक
१३. धर्मराव आत्राम
१४. अनिल पाटील
१५. संजय बनसोडे
१६. प्रताप पाटील चिखलीकर
१७. नवाब मलिक
१८. सयाजी शिंदे
१९. मुश्ताक अंतुले
२०. समीर भुजबळ
२१. अमोल मिटकरी
२२. सना मलिक
२३. रूपाली चाकणकर
२४. इद्रिस नायकवडी
२५. अनिकेत तटकरे
२६. झिशान सिद्धिकी
२७. राजेंद्र जैन
२८. शरद पाटील
२९. सिद्धार्थ टी. कांबळे
३०. सुरज चव्हाण
३१. लहूजी कानडे
३२. कल्याण आखाडे
३३. सुनील मगरे
३४. नाझेर काझी
३५. महेश शिंदे
३६. राजलक्ष्मी भोसले
३७. सुरेखा ठाकरे
३८. नजीब मुल्ला
३९. प्रतिभा शिंदे
४०. विकास पासलकर

Web Title: ajit pawar ncp announces list of 40 star campaigners for upcoming municipal elections mumbai bmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.