'Activists like us were motivated to fight after the meeting in Satara of sharad pawar', dr. Amol kolhe says | 'साताऱ्यातील सभेनंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लढण्याची प्रेरणा मिळाली'

'साताऱ्यातील सभेनंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लढण्याची प्रेरणा मिळाली'

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या खासदार अमोल कोल्हेंनी विजयानंतर पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर अमोल कोल्हे कुठं? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता, कोल्हेंनीच मीडियाला प्रतिक्रिया देताना, राष्ट्रवादीचं यश हे महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ असल्याचं म्हटलंय. तसेच, शरद पवार यांची साताऱ्यातील सभा राजकारणाला वेगळ वळण देणारी ठरल्याचंही ते म्हणाले. 

राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युतीला वर्चस्व मिळालं आहे. मात्र, भाजपा आणि शिवसेनेच्या जागा यंदाच्या निवडणुकीत घटल्या आहेत. तुलनेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगलं यश संपादन केलं असून शरद पवारांच्या झंझावती दौऱ्यामुळे राष्ट्रवादीने अर्धशतक पार करत 54 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीने 54 तर काँग्रेसनेही फिफ्टी मारत 52 जागांवर विजय संपादीत केला. या विजयानंतर राष्ट्रवादीच्या सर्वच दिग्गज नेते आनंदी दिसले, अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. मात्र, शिवस्वराज्य यात्रेचे स्टारप्रचारक डॉ. अमोल कोल्हे विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये कुठेच दिसले नाहीत. आता, अमोल कोल्हेंनी विजयावर सविस्तर प्रतिक्रिया देताना पवारांच्या साताऱ्यातील सभेचं कौतुक केलंय. 

सोशल मीडियातून पवारांच्या साताऱ्यातील सभेचे फोटो व्हायरल झाले होते. माझ्याकडेही एक फोटो आला होता, त्यावर लिहिलेलं वाक्य आमच्यासह सर्वांनाच प्रेरणा देणार आहे. संघर्षाची परिसीमा गाठली असेल आणि आपण हरतोय की काय? असे वाटत असेल तेव्हा माझ्यासमोर एक चित्र असेल ते म्हणजे पवारसाहेबांचा साताऱ्यातील सभेचा फोटो... असे अमोल कोल्हेंनी म्हटलंय. मला काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, त्यामध्ये राजकारणापासून अनभिज्ञ असलेल्या लोकांनीही पवारांचा फोटो पाहून मी आता राजकारण पाहतोय, असं म्हटल्याच कोल्हेंनी सांगितंल. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  'Activists like us were motivated to fight after the meeting in Satara of sharad pawar', dr. Amol kolhe says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.