कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा भगवा फडकला, राजेश क्षीरसागर यांनी मोठ्या मताधिक्यांने विजयी मिळवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 18:07 IST2024-11-23T18:06:12+5:302024-11-23T18:07:59+5:30
कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी दणदणीत विजयी मिळवला. ...

कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा भगवा फडकला, राजेश क्षीरसागर यांनी मोठ्या मताधिक्यांने विजयी मिळवला
कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी दणदणीत विजयी मिळवला. महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा क्षीरसागर यांनी पराभव केला. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपावरुन चुरशीची झाली होती. मात्र, राजेश क्षीरसागर यांनी विजय मिळवत या मतदारसंघात पुन्हा भगवा फडकवला.
मतमोजणीच्या सुरुवातीपासून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी आघाडी घेतली होती. १२ व्या फेरीनंतर मात्र शिंदेसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी लाटकर यांना पिछाडीवर टाकले. यानंतरच्या मतमोजणी फेरीत क्षीरसागर यांनी आपली आघाडी कायम ठेवत अखेर २९ हजार ५६३ मतांचे मताधिक्य घेत विजयी मिळवला.
या मतदारसंघात महायुती अन् महाविकास आघाडीमध्ये घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीमुळे या मतदारसंघाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मधुरिमाराजे यांनी एेनवेळी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचा हात पहिलाच गायब झाला. यानंतर काँग्रेसने अपक्ष उमेदवार लाटकर यांना पाठिंबा देवून या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण केली होती. मात्र राजेश क्षीरसागर यांनी आपण केलेल्या विकास कामावर जोर देत या निवडणुकीत विजयश्री खेचून आणला.