Kolhapur Municipal Election 2026: लिफाफे पाठवले... भाजप गटनेत्याची घोषणा मुंबईतून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:03 IST2026-01-24T16:00:29+5:302026-01-24T16:03:14+5:30

भाजपच्या जिल्हा कार्यालयात राबविण्यात आली प्रक्रिया

The name of the BJP group leader in the Kolhapur Municipal Corporation hall will be announced from Mumbai | Kolhapur Municipal Election 2026: लिफाफे पाठवले... भाजप गटनेत्याची घोषणा मुंबईतून 

Kolhapur Municipal Election 2026: लिफाफे पाठवले... भाजप गटनेत्याची घोषणा मुंबईतून 

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गटनेता या महत्त्वपूर्ण पदाच्या नावाची घोषणाही मुंबईतून करण्यात येणार आहे. यासाठीची प्रक्रिया शुक्रवारी भाजपच्या जिल्हा कार्यालयात राबविण्यात आली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, प्रा. जयंत पाटील आणि नूतन नगरसेवकांची उपस्थिती होती.

महेश जाधव यांनी स्वागत करून प्रस्ताविकामध्ये या बैठकीची रूपरेषा सांगितली. खासदार महाडिक म्हणाले, पक्षाचे नगरसेवक म्हणून जनसेवेच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहणे, आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून प्रभागातील समस्या सोडवणे, सर्वांशी एकदिलाने वागून पक्ष विस्तार, पक्षाच्या वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.

वाचा: कोल्हापूरच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ३० किंवा ३१ जानेवारीला शक्य

यानंतर सर्व भाजप नगरसेवकांनी कोऱ्या लिफाफ्यामधून गटनेता म्हणून आपली पसंतीचे नाव लिहून हे लिफाफे दिले. पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या माध्यमातून हे लिफाफे प्रदेश कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. यानंतर मुंबई प्रदेशातूनच गटनेता नियुक्तीची घोषणा होणार आहे. यावेळी प्रदेश महिला उपाध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हा सरचिटणीस विराज चिखलीकर उपस्थित होते.

Web Title : कोल्हापुर भाजपा गुट नेता की घोषणा मुंबई से होगी

Web Summary : कोल्हापुर नगर निगम के भाजपा गुट नेता की घोषणा मुंबई से की जाएगी। पार्षदों से पसंदीदा नामों वाले लिफाफे एकत्र किए गए और राज्य कार्यालय भेजे जाएंगे। मुंबई में नेतृत्व द्वारा समीक्षा के बाद घोषणा की जाएगी।

Web Title : Kolhapur BJP Group Leader Announcement to Be Made from Mumbai

Web Summary : Kolhapur BJP's group leader for the municipal corporation will be announced from Mumbai. Envelopes with preferred names were collected from corporators and will be sent to the state office. The announcement will be made after review by leadership in Mumbai.