Ichalkaranji Municipal elections 2026: मतविभागणीवरच प्रमुख उमेदवारांचा होणार फैसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:48 IST2026-01-12T15:46:02+5:302026-01-12T15:48:30+5:30
दोन जागांकडे शहराचे लक्ष

Ichalkaranji Municipal elections 2026: मतविभागणीवरच प्रमुख उमेदवारांचा होणार फैसला
अतुल आंबी
इचलकरंजी : प्रभाग क्रमांक १३ व १४ या दोन प्रभागांत तीन माजी नगरसेवक, दोन माजी नगरसेवकांचे नातेवाइक, १३ नवखे आणि ५ अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही प्रभागांत भाजप, शिव-शाहू यांची टक्कर असून अपक्षांसह उद्धव सेना आणि आप प्रत्येकी एक जागांवर मतांची बेरीज-वजाबाकी करत आहे. त्याचा निकालावर कसा परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.
प्रभाग १३ ‘अ’ मध्ये रुपाली सातपुते विरूद्ध मुस्कान खानापुरे अशी पक्षीय लढत असली तरी त्यामध्ये माजी नगरसेविका सायली लायकर या अपक्ष टक्कर देत आहेत. ‘ब’ मध्ये शशिकला कवडे (भाजप), निता पाटील (उद्धव सेना) आणि अश्विनी गोंदकर (शिव-शाहू) अशी तिरंगी लढत आहे. ‘क’ मध्ये चंद्रकांत शेळके विरूद्ध नागेश शेजाळे यांच्यात दुरंगी, तर ‘ड’ मध्ये रणजित लायकर विरूद्ध अमरजित जाधव यांच्यात चुरस आहे.
प्रभाग १४ ‘अ’ मध्ये सपना भिसे विरूद्ध कल्पना धुमाळ, ‘ब’ मध्ये भाजपचे पदाधिकारी शहाजी भोसले यांची पत्नी मेघा भोसले विरूद्ध अॅड. रागिनी मोरबाळे अशी चुरस आहे. ‘क’ मध्ये अभिषेक वाळवेकर विरूद्ध नितीन भुते या दोघांत काटे की टक्कर सुरू आहे. ‘ड’ मध्ये माजी नगरसेवक दीपक सुर्वे यांचा पुतण्या ओमकार सुर्वे (भाजप) विरूद्ध शिव-शाहूकडून अभिषेक सारडा आणि त्यामध्ये आपचे प्रकाश सुतार तिरंगी लढत आहे.
दोन जागांकडे शहराचे लक्ष
प्रभाग १३ ‘क’ आणि १४ ‘क’ मध्ये एकास एक लढत आहे. दोन्ही जागांवरची चुरस आणि माघारीसाठीच्या घडामोडी पाहता या दोन्हीही जागांच्या निकालावर शहरवासीयांत उत्सुकता आहे.
मैत्रीपूर्ण लढत नाही
प्रभाग १३ आणि १४ या दोन्ही प्रभागांत महायुतीची मैत्रीपूर्ण लढत नाही. परंतु एका जागेवर उद्धव सेना आणि एका जागेवर आप हे दोन पक्षही मैदानात उतरले आहेत.