Kolhapur: 'स्वाभिमानी'चे नेते सावकर मादनाईक भाजपच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:23 IST2025-07-01T16:23:00+5:302025-07-01T16:23:20+5:30

शिरोळमध्ये राजकीय भूकंप होण्याचे संकेत

Swabhimani Shetkari Sanghatana leader Savkar Madanaik likely to join BJP | Kolhapur: 'स्वाभिमानी'चे नेते सावकर मादनाईक भाजपच्या वाटेवर

Kolhapur: 'स्वाभिमानी'चे नेते सावकर मादनाईक भाजपच्या वाटेवर

जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकर मादनाईक भाजपच्या वाटेवर आहेत. विधानसभा निवडणुकीपासून त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. चळवळीतील नेता म्हणून त्यांची ओळख असून भविष्यात शिरोळ तालुक्यात तगड्या उमेदीचा कार्यकर्ता भाजपला हवा असेल तर मादनाईक यांना बळ दिले पाहिजे, हे ओळखून त्यांना भाजपमध्ये घेऊन पक्ष मजबूत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे लवकरच मादनाईक हे भाजपचा झेंडा घेण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानीचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यानंतर पहिल्या फळीतील कार्यकर्ता म्हणून मादनाईक यांनी आपली ओळख निर्माण केली होती. स्वाभिमानीची अनेक आंदोलने उभारून त्यांनी यशस्वी केली. दोन वेळा विधानसभा निवडणुकीला त्यांना पराभव पत्करावा लागला. जनतेने घेतलेला निर्णय मान्य करीत त्यांनी चळवळ कायम ठेवली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचे विचार आणि निर्णय पटत नसल्याच्या कारणातून सवतासुभा मांडला. 

आपण सर्वांनी मिळून मादनाईक यांना आमदार करूया, अशी भूमिका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मांडली होती. यानिमित्ताने मादनाईक यांना महायुतीच्या नेत्यांनी नेमका कोणता शब्द दिला आहे, ही चर्चा ताजी असतानाच मादनाईक हे भाजपमध्ये जाण्याचे संकेत मिळत आहेत. 

लवकरच कळेल..

भाजप प्रवेशाबाबत सावकर मादनाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच नक्की काय ते कळेल, अशी प्रतिक्रिया दिली.

Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana leader Savkar Madanaik likely to join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.