Kolhapur: पोलिस चौकीसमोर चाकूहल्ला, एकास अटक; बांबवडे येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 15:47 IST2024-09-16T15:44:07+5:302024-09-16T15:47:44+5:30
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील येथे वडापची गाडी मागे घेत असताना धक्का लागला याचा जाब विचारत असताना झालेल्या मारामारीत प्रवीण ...

Kolhapur: पोलिस चौकीसमोर चाकूहल्ला, एकास अटक; बांबवडे येथील घटना
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील येथे वडापची गाडी मागे घेत असताना धक्का लागला याचा जाब विचारत असताना झालेल्या मारामारीत प्रवीण गुंगा जानकर (रा. बांबवडे) यांने अचानक दीपक सर्जेराव हांडे (रा. सुपात्रे) याच्यावर चाकू हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. यांची नोंद शाहूवाडीपोलिसात उशिरा झाली आहे ही घटना सकाळी बांबवडे पोलिस चौकी समोर घडली. संशयित आरोपी प्रवीण जानकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी: विशाल गुंगा जानकर यानी आपली ओमनी गाडी बांबवडे बसस्टॉप समोर उभा केली होती. गाडी पाठीमागे घेताना त्या गाडीचा धक्का दीपक हांडे यांना लागला. गाडी अंगावर घालतोस काय म्हणून दोघांचे किरकोळ बाचाबाची झाली. गुंगा जानकर व विशाल जानकर तसेच सुभाष हांडे, संदीप हांडे, दीपक हांडे ही दोन्हीकडील मंडळी पोलिस चौकीच्या दारात एकत्र जमा झाली होती. त्यामुळे येथे बघ्याची गर्दी झाली होती.
प्रवीण गुंगा जानकर यांने याने विशाल याच्याशी बाचाबाची व भांडण का केले म्हणून अचानक पोलिस चौकीतून बाहेर पडणाऱ्या दीपक हांडे यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केला. दीपक हांडे याच्यावर धारदार शस्त्राने वार करताच दीपक हांडे खाली कोसळले. बांबवडे चौकीमध्ये कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी अविनाश जाधव, धनाजी कुंभार, प्रवीण केरलेकर यांनी धारदार शस्त्रासह आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले.
यामध्ये दीपक हांडे हे पोटावर धारदार शस्त्राचा गंभीर वार झाल्याने ते जखमी झाल्याने त्यांना बांबवडे येथील प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर सीपीआर येथे पाठविण्यात आले. अधिक तपास शाहूवाडी पोलिस करीत आहे.