Kolhapur: पोलिसांना आव्हान देत रस्त्यावर वाढदिवस केला, जर्मनी गँगच्या सहा जणांना पोलिसांनी चोप दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 18:07 IST2025-02-21T18:06:16+5:302025-02-21T18:07:46+5:30

इचलकरंजी : सोशल मीडियावरून पोलिसांना आव्हान देत जुना सांगली नाका चौकातील रस्त्यावर केक कापून वाढदिवस करणाऱ्या जर्मनी गँगसह मोक्कातील ...

Police beat up six members of Germany gang for celebrating birthday on the street | Kolhapur: पोलिसांना आव्हान देत रस्त्यावर वाढदिवस केला, जर्मनी गँगच्या सहा जणांना पोलिसांनी चोप दिला

Kolhapur: पोलिसांना आव्हान देत रस्त्यावर वाढदिवस केला, जर्मनी गँगच्या सहा जणांना पोलिसांनी चोप दिला

इचलकरंजी : सोशल मीडियावरून पोलिसांना आव्हान देत जुना सांगली नाका चौकातील रस्त्यावर केक कापून वाढदिवस करणाऱ्या जर्मनी गँगसह मोक्कातील सहा संशयित गुन्हेगारांना पोलिसांनी तपासासाठी शहरात फिरवले. साईनगर, यशवंत प्रोसेसर्स, जुना नाका चौक परिसरातील रस्त्यावर फिरवताना संशियतानी सार्वजनिक ठिकाणी पुन्हा दहशत करणार नाही, अशी हात जोडून माफी मागितली.

शाहरूख जमादार (वय २६, रा. जवाहर नगर), वैभव कोरवी (२३, रा. कोरवी गल्ली), अविनाश जाधव ऊर्फ जर्मनी (३१, रा. हनुमाननगर जवाहर नगर), सूरज वाडकर (२६, रा. लिंबू चौक), गौरव मरडे (२७, रा. आय. जी. एम. परिसर), ओंकार धातुंडे (२२, रा. जुना सांगली नाका चौक) अशी त्यांची नावे आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचा भंग करत जर्मनी गँगमधील रूपेश पंडित नरवाडे याचा वाढदिवस डॉल्बीच्या दणदणाटात दहशत माजवत साजरा केला. याबाबत शिवाजीनगर व गावभाग पोलिसांत सुमारे ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना आव्हान देत दहशत माजवत वाढदिवस साजरा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी तपास करून सहा संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांना गुरुवारी रात्री आठ वाजल्यानंतर तपासासाठी घटनास्थळी फिरवले. 

सुरुवातीला यशवंत प्रोसेसर्सपासून शाहू पुतळा मार्गावर फिरवण्यात आले. त्यानंतर साई मंदिर परिसर, मराठा चौक भागातून फिरवत चौकशी केली. पुढे त्यांना जुना सांगली नाका चौक परिसरातील शांती निकेतन शाळेसमोरील रस्त्यावर आणण्यात आले. याठिकाणी गुन्हेगारांनी हात जोडून माफी मागितली. यावेळी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यातील रूपेश नरवाडे हा अद्याप पोलिसांना सापडला नाही.

Web Title: Police beat up six members of Germany gang for celebrating birthday on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.