मालोजीराजे-संजय मंडलिक राम नवमीनिमित्त एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 07:15 PM2024-04-17T19:15:38+5:302024-04-17T19:17:13+5:30

मंडलिकांचे एकीकडे वादग्रस्त वक्तव्य तर दुसरीकडे छत्रपती घराण्यासोबत श्रीरामांचे दर्शन

Malojiraje-Sanjay Mandalik together on Ram Navami in Kagal kolhapur | मालोजीराजे-संजय मंडलिक राम नवमीनिमित्त एकत्र

मालोजीराजे-संजय मंडलिक राम नवमीनिमित्त एकत्र

दुर्वा दळवी

कोल्हापूर: जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीमुळे नेत्यांकडून सुरु असलेल्या टीका-टीपण्णीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक अन् महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांचे सुपुत्र मालोजीराजे एकत्र आल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या. 

कोल्हापुरात बुधवारी मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी साजरी करण्यात आली. शाहू छत्रपती यांनी अंबाबाई मंदिरातील श्रीराम मंदिरात रामाचे मनोभावे दर्शन घेत जन्मकाळ सोहळ्यास उपस्थिती लावली. दरम्यान कागल येथील राम मंदिरात चक्क मंडलिक आणि मालोजीराजे एकाच ठिकाणी श्रीरामांची आरती करताना पाहायला मिळाले. 

कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात श्रीराम जन्मकाळसोहळ्यास माजी आमदार मालोजीराजे सपत्नीक दर्शनाला आले होते. यावेळी याठिकाणी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हेही उपस्थितीत होते. संजय मंडलिक यांच्या सोबत भाजपचे नेते समरजित घाटगे उपस्थित होते. या तिघांनी ही एकत्र श्रीरामांचे दर्शन घेतले. मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्यावर केलेले वादग्रस्त वक्तव्य सद्या चर्चेत आहे. त्यामुळे मंडलिक आणि मालोजीराजे यांना एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

Web Title: Malojiraje-Sanjay Mandalik together on Ram Navami in Kagal kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.