कोल्हापूरकरांनी ठरवलयं.. मान गादीला, मत मोदींना - देवेद्र फडणवीस 

By राजाराम लोंढे | Updated: April 27, 2024 18:07 IST2024-04-27T18:05:38+5:302024-04-27T18:07:00+5:30

'कोल्हापूरचा हुंकार दिल्लीत पोहचवा'

Kolhapurkars have decided Honor to Gadi, vote to Modi says Devendra Fadnavis | कोल्हापूरकरांनी ठरवलयं.. मान गादीला, मत मोदींना - देवेद्र फडणवीस 

कोल्हापूरकरांनी ठरवलयं.. मान गादीला, मत मोदींना - देवेद्र फडणवीस 

कोल्हापूर : कोल्हापूरची लढाई संजय मंडलिक विरुध्द शाहू महाराज आणि धैर्यशील माने विरुध्द महाविकास आघाडी अशी नाही तर नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी अशीच होत आहे. त्यामुळे, मान देऊया गादीला मत देऊया नरेंद्र मोदींना हे कोल्हापूरकरांनी ठरवलयं आहे. कोल्हापूरचा हुंकार दिल्लीत पोहचवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले.

महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविजय संकल्पसभेत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोनाच्या काळात मोफत लस देऊन तमाम भारतवासीयांना जीवंत ठेवले, त्याच नरेद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूकरकरांनी ठरवलं आहे. नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात देशातील २५ कोटी लाेकांना गरीबीच्या बाहेर काढण्याचे रेकॉर्ड केले असून वीस कोटी लाेकांना हक्काचे घर दिले. गरीबांच्या कल्याणाचा चालवलेला अजेंड्याला ताकद देण्यासाठी कोल्हापूरातून संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना विजयी करा.

श्रीरामांचा धनुष्यबाण..

कोल्हापूरकर हे प्रभू रामांना मानणारे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हातात असलेले धनुष्यबाण हे प्रभू रामांचे आहे, धनुष्यबाणाला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत त्यामुळे संजय मंडलीक व धैर्यशील माने यांना साथ द्या, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

टोल लावणाऱ्यांना साथ देणार का?

कोल्हापूरला टोलमुक्त करणारे संजय मंडलिक, धैर्यशील माने यांना साथ देणार की टोल लावणाऱ्यांना साथ देणार? अशी विचारणा फडणवीस यांनी केली.

Web Title: Kolhapurkars have decided Honor to Gadi, vote to Modi says Devendra Fadnavis