Kolhapur Municipal Corporation Election 2025 : 'सत्ता असताना भरलं खीसं, आता म्हणताय..."; कोल्हापुरात सुरू झालं पोस्टर वॉर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:13 IST2025-12-31T15:47:10+5:302025-12-31T16:13:02+5:30
Kolhapur Municipal Corporation Election 2025 : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक सुरू झाली आहे, महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत आहे.

Kolhapur Municipal Corporation Election 2025 : 'सत्ता असताना भरलं खीसं, आता म्हणताय..."; कोल्हापुरात सुरू झालं पोस्टर वॉर!
Kolhapur Municipal Corporation Election 2025 : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत सुरू आहे. महायुतीत भाजपने ३६, शिंदेसेना ३० आणि राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या. महाविकास आघाडीत काँग्रेसने एकट्यानेच ७६ उमेदवार दिले. त्यांच्या आघाडीतील उद्धवसेनेला सहा जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने वंचित व ‘आप’शी आघाडी करून काही अपक्षांना आपल्या कवेत घेतले. दरम्यान, प्रचारालाही सुरूवात झाली. काँग्रेसने शहरात पोस्टर लावले असून यामध्ये 'कोल्हापूर कसं? तुम्ही म्हणशीलात तसं' असे पोस्टर झळकले होते. सुरुवातीला यावर कोणत्याही पक्षाचे नाव नव्हते, मात्र नंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन हे आपले निवडणूक कॅम्पेन असल्याचे जाहीर केले. दरम्यान, आता महायुतीने या कॅम्पेनला पोस्टरनेच उत्तर दिले आहे.
Kolhapur Municipal Election 2026: याद्या जाहीर झाल्या, अनेकांनी कोलांटउड्या घेतल्या
पोस्टरद्वारे महाविकास आघाडीला महायुतीने प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसची 'कोल्हापूर कस्सं...तुम्ही म्हणशीला तस्सं' अशी टॅगलाईन होती. तर सत्ता असताना भरलं खीसं, आता म्हणताय कोल्हापूर कसं?, असे यामध्ये म्हटले आहे. या टॅगलाईनमधून महायुतीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हे पोस्टर कोल्हापुरच्या प्रवेशद्वाराजवळ झळकले आहेत. या दोन्ही पोस्टरची आता कोल्हापुरात जोरात चर्चा सुरू आहे.
काल अनेकांनी अर्ज केले दाखल
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षीय उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांनी ज्या पक्षाची उमेदवारी मिळेल ती स्वीकारून मैदानात उडी घेतली. आपल्यातील नाराज अन्य पक्षांकडे जाऊ नये, यासाठी याद्या दाबून ठेवल्या खऱ्या; परंतु ज्यांना लढायचेच होते त्यांनी मिळेल तो झेंडा हातात घेऊन शड्डू ठोकलाच.
सकाळपर्यंत भाजपचे उमेदवार असलेले दुपारनंतर काँग्रेसच्या यादीत झळकले. जिथे भाजपची उमेदवारी मिळाली नाही त्यातील बरेच जनसुराज्य पक्षाच्या सावलीला गेले. सर्व वीस प्रभागांत उमेदवारी देताना महायुतीसह महाविकास आघाडीचीही दमछाक झाली. महायुतीकडे जास्त इनकमिंग असल्याने त्यांना नाराजीला जास्त सामोरे जावे लागले.