Kolhapur: जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले मतदान, कंट्रोल रुममधून जिल्हाधिकाऱ्यांचा वॉच
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 7, 2024 13:27 IST2024-05-07T13:24:40+5:302024-05-07T13:27:04+5:30
दरम्यान या तीनही अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील मतदान व्यवस्थित पार पडत असल्याची खात्री केली

Kolhapur: जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले मतदान, कंट्रोल रुममधून जिल्हाधिकाऱ्यांचा वॉच
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज, मंगळवारी उत्साहात मतदान सुरु आहे. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक उत्तमपणे पार पडावी यासाठी गेले महिनाभर झटत असलेल्या जिल्ह्यातील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी दत्ताबाळ हायस्कूल येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कसबा बावडा येथील महागावकर हायस्कूल येथे मतदान केले.अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी छत्रपती शाहू कॉलेज येथे मतदान केले. दरम्यान या तीनही अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील मतदान व्यवस्थित पार पडत असल्याची खात्री केली.
कंट्रोल रुममधून जिल्हाधिकाऱ्यांचा वॉच
जिल्हाधिकारी अमाले येडगे सकाळपासून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर व्यवस्थित मतदान होत आहे, कुठे अडचण नाही ना याची माहिती घेत होते. ज्याज्या मतदान केंद्रांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसविले होते. त्या केंद्रांची जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रुममधून त्यांनी पाहणी केली.