कोल्हापुरात उद्धवसेनेतील अंतर्गतवाद उफाळला, स्वीकृत नगरसेवक निवडीवरुन शहरप्रमुखांच्या घरासमोर शिवसैनिकांचा राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:55 IST2026-02-20T15:54:50+5:302026-02-20T15:55:39+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकाची निवड झाल्यानंतर उद्धवसेनेतील अंतर्गतवाद उफाळून आला आहे. महाविकास आघाडीतून शहर प्रमुख सुनील मोदी ...

कोल्हापुरात उद्धवसेनेतील अंतर्गतवाद उफाळला, स्वीकृत नगरसेवक निवडीवरुन शहरप्रमुखांच्या घरासमोर शिवसैनिकांचा राडा
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकाची निवड झाल्यानंतर उद्धवसेनेतील अंतर्गतवाद उफाळून आला आहे. महाविकास आघाडीतून शहर प्रमुख सुनील मोदी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला. आक्रमक शिवसैनिकांनी थेट सुनील मोदी यांच्या घरी जाऊन जाब विचारल्याने वातावरण तणावपुर्ण बनले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
परिवहन समितीमध्ये विशाल देवकुळे यांचे नाव डावल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी सुनील मोदी यांच्या घरासमोर गोंधळ घातला. यावेळी देवकुळे यांनी आपली निवड का झाली नाही याबाबत जाब विचारला. तुमची निवड कशी झाली, तुम्ही शिवसेनेचा घात केला असा गंभीर आरोप केला. शिवसैनिकांना काँग्रेसच्या दावणीला बांधायचे ठरवले आहे का असा मोदींना सवाल केला.
यावेळी मोदींनी या निवडीबाबत आपण काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याशी बोलो असल्याचे सांगितले. मात्र देवकुळे यांनी शहरप्रमुख म्हणून तुमची जबाबदारी होती, मात्र तुम्ही गुलाल लावून आणि आम्ही इथच. पदासाठी तुम्ही शिवसैनिकाचा घात करत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. यामुळे उद्धवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.