Kolhapur: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार, स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 16:50 IST2023-07-25T16:49:40+5:302023-07-25T16:50:23+5:30
सुरक्षितता म्हणून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे

Kolhapur: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार, स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता
गौरव सांगावकर
राधानगरी : राधानगरीधरण क्षेत्रात पावसाची संतधार कायम आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास उद्या, बुधवार (दि.२६) पहाटे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
धरणक्षेत्रात आज दुपारी चार पर्यत ३६ मी. मी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत पाणी पातळी ३४५. ५५ फूट व पाणीसाठा ७९९०.५६ द.ल.घ.फू (७.९९ टी एम सी) इतका आहे. ९५.५६ टक्के धरण भरले असून खासगी जलविद्युत केंद्रातून १५५० क्यूसेकने विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु आहे. आज रात्रभर पावसाने जोर धरल्यास पहाटे स्वयंचलीत धरवाजे खुले होतील. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
सुरक्षितता म्हणून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. आणखी चार दिवस जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून, पंचगंगेची पातळी ४०.५ फुटांपर्यंत पोहोचली आहे. तब्बल ८२ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.