kolhapur: इचलकरंजी-सुळकूड पाणीप्रश्नी तज्ज्ञ समिती नियुक्त, मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 17:36 IST2024-03-01T17:35:23+5:302024-03-01T17:36:12+5:30
‘लोकमत’ चे वृत्त खरे ठरले

kolhapur: इचलकरंजी-सुळकूड पाणीप्रश्नी तज्ज्ञ समिती नियुक्त, मुख्यमंत्र्यांची घोषणा
अतुल आंबी
इचलकरंजी : इचलकरंजी-सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलविलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञ समिती नियुक्त केली असून, या समितीचा एक महिन्यात अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या योजनेवर निर्णय होणार आहे.
नदीकाठावरील अन्य ३२ गावांना पाणी देण्याचे नियोजन असल्याने त्यांचा विचार करून त्यानंतरच इचलकरंजीचा विचार केला जाईल, असे ठाम मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडले. दोन्हीकडील प्रतिनिधींनी आक्रमकपणे आपल्या भूमिका मांडल्या. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी संयुक्त समिती नेमली.
या बैठकीकडे इचलकरंजी, कागल आणि शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रताप होगाडे, आदींसह दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी, शासनाचे अधिकारी उपस्थित होते.
‘लोकमत’ चे वृत्त खरे ठरले
‘सुळकूड पाणी योजनेबाबत समिती नेमण्याच्या हालचाली’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ ने शुक्रवारी दिलेले वृत्त खरे ठरले. बैठक आणि घडामोडींसंदर्भात सविस्तर वृत्त प्रसारीत करण्यात आले. त्याची चर्चा शहरात रंगली होती.