हातकणंगले नगराध्यक्षपद खुले झाल्याने घमासान, इच्छुकांची संख्या वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:08 IST2025-10-07T18:08:07+5:302025-10-07T18:08:35+5:30
हातकणंगले : येथील नगराध्यक्षपद खुले झाल्याने महायुती आणि महाआघाडीमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार आहे. भाजपाकडून माजी नगरसेवक राजू इंगवले, शिंदे ...

हातकणंगले नगराध्यक्षपद खुले झाल्याने घमासान, इच्छुकांची संख्या वाढणार
हातकणंगले : येथील नगराध्यक्षपद खुले झाल्याने महायुती आणि महाआघाडीमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार आहे. भाजपाकडून माजी नगरसेवक राजू इंगवले, शिंदे सेनेकडून माजी सरपंच अजितसिंह पाटील तर काँग्रेसकडून पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक वाडकर प्रमुख दावेदार आहेत. गत निवडणुकीत अनुसूचित जातीचे आरक्षण होते. सत्ता भाजपा - शिंदेसेनेकडे तर नगराध्यक्ष काँग्रेसचा झाला होता. एकत्रित शिवसेनेमधील सर्व नगरसेवक खासदार धैर्यशील माने यांच्याबरोबर शिंदेसेनेत सामील झाले.
राज्यात महायुतीची सत्ता असली तरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीला मिळते-जुळते घ्यावे लागणार आहे. पक्षापेक्षा स्थानिक आघाड्यांतूनच ही निवडणूक होण्याचे संकेत आहेत. आमदार अशोकराव माने जनसुराज्य पक्षाचे असल्याने त्यांना भाजपा आणि शिंदेसेनेबरोबर जुळवून घेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. तर शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपाचे ज्येष्ठ माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले महायुतीची मोट कशी बांधतात, यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे.