संजय मंडलिक यांची संपत्ती वाढली, धैर्यशील मानेंची घटली; दोघांची एकूण संपत्ती किती.. जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 11:51 AM2024-04-16T11:51:36+5:302024-04-16T11:53:25+5:30

माने-मंडलिक व्यवसायाने शेतकरी

Candidate of Mahayuti in Kolhapur Lok Sabha Constituency Prof. Sanjay Mandlik total wealth is Rs 14 crores while Dhairyasheel Mane is Rs 4 crores | संजय मंडलिक यांची संपत्ती वाढली, धैर्यशील मानेंची घटली; दोघांची एकूण संपत्ती किती.. जाणून घ्या सविस्तर

संजय मंडलिक यांची संपत्ती वाढली, धैर्यशील मानेंची घटली; दोघांची एकूण संपत्ती किती.. जाणून घ्या सविस्तर

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांची एकूण संपत्ती १४ कोटी ३७ लाख २८ हजार ३९८ रुपये इतकी आहे. मंडलिक यांच्या संपत्तीत २०१९ च्या तुलनेत तब्बल ५ कोटी ६५ लाख रुपयांनी वाढ झाली. खा. मंडलिक यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत विवरणपत्र जोडले आहे. त्यात जंगम मालमत्ता १ कोटी १५ लाख, ३२ हजार ५२५ रुपये असल्याचे म्हटले आहे. तसेच १३ कोटी २१ लाख ९५ हजार ८७३ रुपये किमतीची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती १४ कोटी ३७ लाख २८ हजार ३९८ रुपये इतकी आहे.

गत निवडणुकीवेळी मंडलिक यांची मालमत्ता ९ कोटी ५१ लाख ७१ हजार रुपये इतकी होती. ती आता वडिलोपार्जित मालमत्तेसह १४ कोटी ३७ लाख २८ हजार ३९८ रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीचा विचार करता त्यांची मालमत्ता ५ कोटी ६५ लाख रुपयांनी वाढली. खा. मंडलिक यांनी स्वसंपादित केलेल्या स्थावर मालमत्तेची खरेदी किंमत १ कोटी १५ लाख ७३ हजार आहे. स्थावर मालमत्तेचा विकासाचा/बांधकामाचा खर्च २ कोटी ८७ लाख ७३ हजार ५२८ आहे. चालू बाजार किंमत १ कोटी ७६ लाख ८५ हजार ४७५ इतकी आहे. स्वसंपादित मूल्य एकूण ४ कोटी १ लाख ४ हजार ३५३ रुपये इतके आहे.

वारसामूल्य एकूण ९ कोटी २० लाख ९१ हजार ५२० रुपये आहे. तसेच खा. मंडलिक यांच्या पत्नी वैशाली यांच्या नावे जंगम मालमत्ता ३७ लाख २३ हजार ६८१ रुपये आहे. स्थावर मालमत्ता २० लाख ३८ हजार ८५० रुपये आहे. स्वसंपादित मालमत्तेची खरेदी किंमत ५ लाख २५ हजार आहे. अदमासे चालू बाजार किंमत २० लाख ३८ हजार ८५० रुपये आहे. वैशाली मंडलिक यांच्यावर ७० हजार ९०० रुपयांचे कर्ज आहे.

संजय मंडलिक

  • जंगम : १ कोटी १५ लाख ३२ हजार ५२५ रुपये
  • स्थावर : १३ कोटी २१ लाख ९५ हजार ८७३ रुपये
  • वारसाप्राप्त मालमत्ता : ९ कोटी २० लाख ९१ हजार ५२० रुपये
  • कर्ज : ३ कोटी ४१ लाख १८ हजार
  • वाहने : स्कोडा, ॲक्टिव्हा
  • सोने : ३५ लाख ९२ हजार ५०० रुपये


माने-मंडलिक व्यवसायाने शेतकरी

मंडलिक व माने यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही. मंडलिक-माने या दोघांनीही आपला व्यवसाय शेतकरी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या पत्नी मात्र व्यावसायिक आहेत.

मंडलिक बीए, बीएड

मुरगुड (ता. कागल) येथील मूळ रहिवासी असलेले मंडलिक यांनी १९८९ मधून शिवाजी विद्यापीठातून एमएची पदव्युत्तर पदवी मिळवली. पुढे कागलच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून त्यांनी १९९२ मध्ये बीएड केले.

धैर्यशील माने यांची मालमत्ता झाली ३० लाखांनी कमी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांची स्थावर व जंगम मालमत्ता ४ कोटी ४५ लाख ६१ हजार ८२८ रुपये इतकी आहे. गत निवडणुकीपेक्षा मात्र ती ३० लाखांनी कमी झाली आहे. रुकडी (ता. हातकणंगले) येथील रहिवासी असलेल्या माने यांनी रुकडी येथील शेतजमीन, पाचगाव येथील प्लॅाटसची माहिती विवरणपत्रात दिली आहे. गतवेळी माने यांची संपत्ती ४ कोटी ७७ लाख ७१ हजार ३६३ इतकी होती. यात यंदा जवळपास ३० लाख रुपयांनी घट झाली आहे. गतवेळी माने यांच्यावर ४ कोटी १५ लाख ९९ हजार ९५९ रुपयांचे कर्ज होते. सध्या माने यांच्यावर २ कोटी १९ लाख ७५ हजार ६७२ रुपयांचे कर्ज आहे.

धैर्यशील माने

  • स्थावर मालमत्ता : ३ कोटी ५८ लाख रुपये
  • जंगम मालमत्ता : ८७ लाख ६० हजार ८२८ रुपये
  • कर्ज : २ कोटी १९ लाख ७५ हजार ६७२ रुपये


मुक्त विद्यापीठाचे पदवीधर

खासदार माने हे मे २०१६ मध्ये नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बीए झाले आहेत. खासदार माने यांच्या पत्नी वेदांतिका माने यांनी २०१९ पासून २०२३ पर्यंत आयकर विवरण पत्रे भरलेली नाहीत.

Web Title: Candidate of Mahayuti in Kolhapur Lok Sabha Constituency Prof. Sanjay Mandlik total wealth is Rs 14 crores while Dhairyasheel Mane is Rs 4 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.