कोल्हापुरात उद्या प्रचारसभांचा धडाका, इचलकरंजीत योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या एकाच वेळी सभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 18:53 IST2024-04-30T18:52:49+5:302024-04-30T18:53:43+5:30
इचलकरंजी : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी शहरात एकाच दिवशी दोन मोठ्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी १ ...

कोल्हापुरात उद्या प्रचारसभांचा धडाका, इचलकरंजीत योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या एकाच वेळी सभा
इचलकरंजी : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी शहरात एकाच दिवशी दोन मोठ्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी १ मे या दिवसाकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सांभा होणार आहेत. एकाच दिवशी एकाच वेळी या सभा होणार असल्याने प्रशासनावरही मोठा ताण राहणार आहे.
शहरातील श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांची सभा १ मे ला सांयकाळी ५ वाजता होणार आहे. त्यासाठी सरुडकर यांनी घटक पक्षांच्या पदाधिका-यांची काँग्रेस समितीत बैठक घेवून नियोजन केले आहे.
तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही सभा त्याच दिवशी निश्चीत झाली आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ थोरात चौकात १ मे ला सांयकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे. त्यानुसार कार्यकर्ते कामाला लागले आहेत. एकाच दिवशी दोन मोठ्या जाहीर सभा होणार असल्यामुळे शहरवासीयांसह मतदार संघाचे लक्ष लागले आहे.