Kolhapur Mayor: रुपाराणी निकम-सचिन शेंडे यांच्यात आज महापौरपदासाठी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:26 IST2026-02-06T11:25:04+5:302026-02-06T11:26:36+5:30

महापालिका राजकारणाचा नवा अध्याय : अक्षय जरग-दुर्वास कदम यांच्यात उपमहापौरपदासाठी चुरस

BJP's Ruparani Sangram Nikam and Congress' Sachin Maruti Shende are in a fight for the post of Mayor of Kolhapur | Kolhapur Mayor: रुपाराणी निकम-सचिन शेंडे यांच्यात आज महापौरपदासाठी लढत

Kolhapur Mayor: रुपाराणी निकम-सचिन शेंडे यांच्यात आज महापौरपदासाठी लढत

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार खऱ्या अर्थाने आज, शुक्रवारपासून लोकप्रतिनिधींच्या हाती सोपविला जात आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या सार्वजनिक निवडणुकीनंतर महानगरपालिकेची पहिलीच विशेष सर्वसाधारण सभा पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून त्यामध्ये महापौर व उपमहापौर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

कोल्हापूर महापौरपदासाठी भाजपच्या रुपाराणी संग्राम निकम तर काँग्रेसच्या सचिन मारुती शेंडे यांनी तर उपमहापौरपदासाठी जनसुराज्य शक्तीकडून अक्षय विक्रम जरग तर काँग्रेसकडून दुर्वास परशुराम कदम यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. सभागृहातील संख्याबळ पाहता महायुतीच्या रुपाराणी निकम तर अक्षय जरग यांची निवड निश्चित असून आज, शुक्रवारच्या सभेत त्यावर हात वर करून मतदान घेतले जाईल आणि त्यानंतर पीठासन अधिकारी या दोघांची निवड घोषित करतील.

महानगरपालिकेची निवडणूक गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित होती. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा कारभार प्रशासकांच्या हाती एकवटला होता. एकीकडे प्रशासक कारभार करत असताना दुसरीकडे महापालिकेच्या निवडणुका कधी होतात आणि आपण नगरसेवक म्हणून कधी निवडून येतोय याची अनेक जण स्वप्न पाहत होते. अखेर १६ जानेवारी रोजी शहरातील ८१ जणांना नगरसेवक होण्याचे भाग्य लाभले. आता शुक्रवारपासून लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होत आहे.

नगरसेवक एकत्र येणार महापालिकेत

महायुतीच्या सर्व नगरसेवकांना सकाळी साडेआठ वाजता नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात तर काँग्रेस-उद्धवसेनेच्या नगरसेवकांना ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा कार्यालयात गोळा होण्याचे निरोप नवनिर्वाचित नगरसेवकांना देण्यात आले आहे. तेथून ते एकत्रपणे महापालिका चौकात येणार आहेत. या नगरसेवकांच्या सोबत महायुती, काँग्रेसचे नेतेही महापालिका चौकात येतील.

नगरसेवकांना व्हीप लागू

महापालिका सभागृहातील महायुतीचे संख्याबळ पाहता खबरदारी म्हणून महायुतीच्या सर्व नगरसेवकांना अधिकृत उमेदवार रुपाराणी निकम यांना मतदान करण्याबाबत गटनेते मुरलीधर जाधव यांनी व्हीप लागू केला. काँग्रेसकडूनही व्हीप लागू करण्याची प्रक्रिया सायंकाळनंतर सुरू झाल्याचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी सांगितले.

अशी होणार निवडणूक प्रक्रिया 

- सकाळी ११ वाजता होणार विशेष सर्वसाधारण सभा
- बरोबर ११ वाजता सभागृहाची सर्व दरवाजे होणार बंद
- राष्ट्रगीताने होणार सभेला सुरुवात
- नगरसेवकांच्या हजेरीपत्रकावर घेणार सह्या
- नगरसचिव विशेष सर्वसाधारण सभेचा अजेंडा वाचून दाखवणार
- महापौरपदासाठी दोन अर्ज आल्याने माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी
- कोणी माघार घेतली तर बिनविरोध आणि नाही घेतली तर मतदान होणार
- सभागृहात हात वर करून होणार मतदान, सर्व प्रक्रियेचे होणार चित्रीकरण
- पीठासन अधिकारी करणार विजयी उमेदवारांच्या नावाची घोषणा

सभागृहातील संख्याबळ

महायुती : भाजप- २६, शिंदे सेना १५, राष्ट्रवादी - ४ जनसुराज्यशक्ती १ = ४६
काँग्रेस - ३४, उद्धवसेना - १ = ३५

Web Title : कोल्हापुर महापौर चुनाव: आज निकम बनाम शेंडे के बीच मुकाबला।

Web Summary : कोल्हापुर महानगरपालिका आज महापौर का चुनाव करेगी। भाजपा की निकम और कांग्रेस के शेंडे मैदान में हैं। महायुति के पास बहुमत है, जिससे निकम का पलड़ा भारी है। चुनाव प्रक्रिया में रोल कॉल, एजेंडा पढ़ना और मतदान शामिल है। परिणाम पीठासीन अधिकारी द्वारा घोषित किए जाएंगे।

Web Title : Kolhapur Mayor Election: Nikam vs. Shende face-off for the post today.

Web Summary : Kolhapur Municipal Corporation elects its Mayor today. BJP's Nikam and Congress's Shende are contesting. Mahayuti holds majority, likely favoring Nikam. Election process includes roll call, agenda reading, and voting. Results will be announced by the presiding officer.