LokSabha2024: कोल्हापूरची जनता शाहू छत्रपती यांच्या मागे, जनतेचाच विजय होईल; ऋतुराज पाटील यांना विश्वास
By पोपट केशव पवार | Updated: May 7, 2024 13:01 IST2024-05-07T12:59:39+5:302024-05-07T13:01:17+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील लोकांचा कल हा शाहू छत्रपती यांच्या बाजूने आहे. त्यामुळे ही निवडणूक जनता विरुद्ध भाजप ...

LokSabha2024: कोल्हापूरची जनता शाहू छत्रपती यांच्या मागे, जनतेचाच विजय होईल; ऋतुराज पाटील यांना विश्वास
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील लोकांचा कल हा शाहू छत्रपती यांच्या बाजूने आहे. त्यामुळे ही निवडणूक जनता विरुद्ध भाजप अशी आहे. यात जनतेचा म्हणजे शाहू छत्रपती यांचाच विजय होईल, असा विश्वास कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. आमदार ऋतुराज पाटील यांनी उजळावाडी (ता.करवीर) येथील उजळवाईवाडी विद्यामंदिर शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आमदार पाटील म्हणाले, शाहू छत्रपती हे अभ्यासू नेतृत्व आहेत. त्यामुळे कोल्हापुरचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ते आग्रही राहतील हा विश्वास आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा वारसा जोपासण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल.