Kolhapur: एकटी असल्याचे पाहून घरात घुसला, शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:17 IST2025-03-20T16:15:55+5:302025-03-20T16:17:54+5:30

इचलकरंजी : बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून एका शिक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना रविवारी ...

A teacher sexually assaulted a minor girl after finding her alone at home in Ichalkaranji Kolhapur District | Kolhapur: एकटी असल्याचे पाहून घरात घुसला, शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला

Kolhapur: एकटी असल्याचे पाहून घरात घुसला, शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला

इचलकरंजी : बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून एका शिक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना रविवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास घडली. विजय भागवत कुंडलकर (वय ३६, रा.म्हाडा कॉलनी, शहापूर. मूळ गाव कोकलमोहा, जि.बीड) असे त्या नराधमाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने शहापूर पोलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दिली.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विजय हा शिक्षक असून, रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळच्या सुमारास एका घरामध्ये पीडित अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचे पाहून तो पाठीमागील दरवाजाने घरात घुसला. तेथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला, तसेच याबाबत घरात सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.

दरम्यान, हा प्रकार तिच्या आईला समजल्यानंतर तिने बुधवारी शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत.

Web Title: A teacher sexually assaulted a minor girl after finding her alone at home in Ichalkaranji Kolhapur District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.