Kolhapur: जुना वाद, इचलकरंजीत टोळक्याकडून बेदम मारहाण; चौघे जखमी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 18:46 IST2025-06-03T18:46:03+5:302025-06-03T18:46:48+5:30

२ अल्पवयीनसह २२ जणांना अटक

A gang attacked four people with sharp weapons and sticks in Ichalkaranji seriously injuring them over an old dispute | Kolhapur: जुना वाद, इचलकरंजीत टोळक्याकडून बेदम मारहाण; चौघे जखमी, व्हिडीओ व्हायरल

Kolhapur: जुना वाद, इचलकरंजीत टोळक्याकडून बेदम मारहाण; चौघे जखमी, व्हिडीओ व्हायरल

इचलकरंजी : सूर्योदयनगर येथे जुन्या वादातून एका टोळक्याने धारदार शस्त्र व लाकडांनी चौघांना मारून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी २ अल्पवयीनसह २२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जखमींना उपचारासाठी सांगली व कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी सुशांत अर्जुन रानमाळे (वय २५, रा. इंदिरा कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे.

सुशांत रानमाळे, नौशाद करीम मुजावर (२४, रा. स्वामी अपार्टमेंट), आयुब अहमद अत्तार (२२, रा.केटकाळेनगर) व सागर अमर शिकलगार (२०, रा. शिकलगार वसाहत) अशी जखमींची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सुशांत, नौशाद, आयुब आणि सागर हे चार मित्र सूर्योदयनगर जुन्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या कट्ट्यावर सोमवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास बोलत बसले होते. त्यावेळी जुन्या रागातून संशयित आरोपींनी येऊन धारदार शस्त्रे, दांडके आणि दगडाने बेदम मारहाण केली व तेथून पसार झाले. 

यामध्ये नौशाद व आयुब हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना आयजीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती अधिक गंभीर असल्याने सांगली व कोल्हापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर तातडीने धरपकड मोहीम राबवून दोन अल्पवयीनसह २२ जणांना अटक केली. 

सीसीटीव्ही व्हिडीओची चर्चा

सूर्योदयनगर व जवाहरनगर परिसरात वारंवार मारामारीच्या घटना घडताना दिसत आहेत. या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला. त्याची शहरामध्ये दिवसभर चर्चा सुरू होती.

Web Title: A gang attacked four people with sharp weapons and sticks in Ichalkaranji seriously injuring them over an old dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.