Kolhapur: ७३ वर्षीय वृद्धाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 15:37 IST2024-09-16T15:37:11+5:302024-09-16T15:37:35+5:30

राधानगरी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीपती रामचंद्र भोसले (वय ७३, रा. नरतवडे ता. राधानगरी ) याला पोलिसांनी ...

A 73 year old man sexually assaulted a minor girl in Radhanagari of Kolhapur district | Kolhapur: ७३ वर्षीय वृद्धाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोलिसांनी केली अटक 

Kolhapur: ७३ वर्षीय वृद्धाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोलिसांनी केली अटक 

राधानगरी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीपती रामचंद्र भोसले (वय ७३, रा. नरतवडे ता. राधानगरी) याला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील एका क्लासेसमध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत आरोपी श्रीपती रामचंद्र भोसले याने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून अश्लील चाळे केले.

महिला कधी सुरक्षित होणार ? कोल्हापूर जिल्ह्यात सात महिन्यांत ११० बलात्कार

घडला प्रकार घरी सांगितल्यास तुझे आई, वडील, आजाेबा, आजी मरतील अशी शपथ घालून मुलीला धमकावले. याप्रकरणी श्रीपती भोसले याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: A 73 year old man sexually assaulted a minor girl in Radhanagari of Kolhapur district