उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज डोंबिवलीत, खुर्च्या, स्टेज, मंडप, मैदान भिजले

By अनिकेत घमंडी | Updated: May 13, 2024 16:56 IST2024-05-13T16:56:04+5:302024-05-13T16:56:24+5:30

कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडी ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे यांचे सभा डोंबिवली भागशाला मैदानात होणार आहे .

Uddhav Thackeray's public meeting today in Dombivli, chairs, stage, mandap, ground got wet | उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज डोंबिवलीत, खुर्च्या, स्टेज, मंडप, मैदान भिजले

उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज डोंबिवलीत, खुर्च्या, स्टेज, मंडप, मैदान भिजले

डोंबिवली: उद्धव ठाकरेंच्या सभेवर पावसाचे सावट असून पश्चिमेकडील भागशाळा मैदानात सोमवारी संध्याकाळी ७ वाजता ही सभा संपन्न होणार आहे. त्यासाठी मैदानात खुर्च्या, मंडप, स्टेज घालण्यात आले असून सगळं पावसात भिजले आहे. साउंड सिस्टीम पाण्यात भिजली असून सभेला गर्दी कशी जमवायची हा मोठा प्रश्न महाविकास आघाडी समोर आहे.

कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडी ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे यांचे सभा डोंबिवली भागशाला मैदानात होणार आहे. आज दुपार नंतर कल्याण डोंबिवलिसह आसपासच्या परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचे सावट उद्धव ठाकरे यांच्या सभेवर आहे. पावसामुळे सभास्थळी खुर्च्या मंडप देखील भिजला तर पाहायला मिळतो या पावसात सभेसाठी गर्दी आणण्याचा आव्हान देखील आता ठाकरे गटासमोर उभा ठाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Web Title: Uddhav Thackeray's public meeting today in Dombivli, chairs, stage, mandap, ground got wet