खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्त्यांसह खाल्ला शिव वडापाव

By अनिकेत घमंडी | Updated: April 29, 2024 15:52 IST2024-04-29T15:50:40+5:302024-04-29T15:52:01+5:30

भजीचीही चाखली चव

mp shrikant shinde eat shiv vada pav with party workers | खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्त्यांसह खाल्ला शिव वडापाव

खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्त्यांसह खाल्ला शिव वडापाव

अनिकेत घमंडी, डोंबिवली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत वैयक्तिक भेटीगाठी, कार्यकर्ता मेळावे  सुरू  आहेत. अशातच सोमवारी पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज अर्धाकृती पुतळ्याजवलील शिवसेनेच्या डोंबिवली शहर शाखेत खासदार श्रीकांत शिंदे आले होते, त्यावेळी त्या शाखे बाहेरच असलेला शिव वडापाव खाण्याचा मोह त्यांना आवरला नाही.

आणि त्यांनी कार्यकर्त्यांसह वडापाव, भजीची चव चाखली. खासदार शिंदेंना वडापावच्या गाडीवर उभं राहून वडापाव खाताना पाहून डोंबिवलीकरांनाही सुखद धक्का बसला. अधून मधून आम्हीही या पदार्थांचा आस्वाद घेतो असे शिंदे म्हणाले. त्यावेळी उपजिल्हाध्यक्ष राजेश कदम, संतोष चव्हाण यांच्यासह शिंदे यांचे सुरक्षा रक्षक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: mp shrikant shinde eat shiv vada pav with party workers