श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही; भाजपा आमदार गणपत गायकवाड समर्थकांचा ठराव

By मुरलीधर भवार | Published: April 5, 2024 11:38 PM2024-04-05T23:38:44+5:302024-04-05T23:39:27+5:30

loksabha Election - कल्याण येथील गोळीबार प्रकरणाचे पडसाद आता लोकसभा निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत. कल्याण पूर्वेतील भाजपा कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही असा ठराव केला आहे.

Kalyan Loksabha Election 2024: We will not do the work of Shrikant Shinde, the resolution of BJP workers supporting MLA Ganpat Gaikwad | श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही; भाजपा आमदार गणपत गायकवाड समर्थकांचा ठराव

श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही; भाजपा आमदार गणपत गायकवाड समर्थकांचा ठराव

कल्याण - BJP Opposed Shrikant Shinde ( Marathi News ) कल्याण लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार द्यावा अन्यथा श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही असं ठराव आज भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या बैठकीत करण्यात आला आहे. 

ही बैठक आज रात्री उशिरा भाजप आमदार गायकवाड यांच्या कार्यालयात पार पडली यावेळी त्यांचे समर्थक असलेले भाजप कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत झालेला ठराव भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.  

या संदर्भात भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की कल्याण पूर्व येथील भाजप आमदार गायकवाड यांच्या कार्यालयात काय बैठक पार पडली याविषयी मला काही माहिती नाही मी माहिती घेऊन सांगतो मात्र मी या दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पलावा येथील निवासस्थानी निवडणूक संदर्भातील बैठकीत उपस्थित होतो. गणपत गायकवाड यांच्या पाठीशी केवळ कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्ते नाहीत तर संपूर्ण भाजप आहे.

फेब्रुवारी महिन्यात एका जमिनीच्या वादातून भाजप आमदार गायकवाड यांनी उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात शिंदे सेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या आधीपासून भाजप आमदार गायकवाड आणि शिंदे वाद होता. त्यामुळे भाजप आमदार गायकवाड समर्थक भाजप कार्यकर्ते यांनी कल्याण लोकसभेतून भाजपाचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली आहे.

Web Title: Kalyan Loksabha Election 2024: We will not do the work of Shrikant Shinde, the resolution of BJP workers supporting MLA Ganpat Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.