विधवा सुनेला प्रॉपर्टी मिळू नये म्हणून ५८ वर्षांच्या सासूने दिला मुलाला जन्म, प्रकरण वाढलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 05:39 PM2023-05-23T17:39:07+5:302023-05-23T17:40:03+5:30

पतीच्या निधनानंतर सून माहेरी राहत होती. तिने सासू-सासऱ्यांकडे प्रॉपर्टीत हिस्सा मागितला.

Shocking as 58 years old mother in law delivered a baby boy when widow daughter in law was demanding property | विधवा सुनेला प्रॉपर्टी मिळू नये म्हणून ५८ वर्षांच्या सासूने दिला मुलाला जन्म, प्रकरण वाढलं अन्...

विधवा सुनेला प्रॉपर्टी मिळू नये म्हणून ५८ वर्षांच्या सासूने दिला मुलाला जन्म, प्रकरण वाढलं अन्...

googlenewsNext

Family matter: कौटुंबिक समुपदेशन केंद्रात रविवारी एक विचित्र प्रकरण समोर आले. एका विधवा सुनेने सासू-सासऱ्यांच्या मालमत्तेच्या वाटणीवरून गोंधळ घातला. सासरचे लोक तिला संपत्तीत वाटेकरी करत नसल्याचा आरोप सुनेने केला आहे, तसेच सासू तिच्या वयाच्या ५८ व्या वर्षी गरोदर राहिली असून यामागे प्रॉपर्टी न देण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप सुनेने केला आहे. येथे सासू-सासऱ्यांनीही आपल्या सुनेवर अनेक आरोप केले आहेत. यात काही विचित्र घटनाही घडताना दिसल्या आहेत. तसेच दोन्ही बाजूंमध्ये कोणताही समझोता न झाल्याने त्यांना पुढील तारीख देण्यात आली आहे.

नक्की काय घडलं?

आग्राच्या सैया भागात राहणाऱ्या एका मुलीने सांगितले की, तिचे चार वर्षांपूर्वी कमला नगरमध्ये लग्न झाले होते. तिचा नवरा जिम चालवायचा. तिचा नवरा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुनेला मूल झालेले नाही. त्यामुळे पतीच्या निधनानंतर ती आपल्या माहेरच्या घरी राहत आहे. पण सुनेने आरोप केला आहे की तिने तिच्या सासरच्या लोकांकडून मालमत्तेत हिस्सा मागितला होता, परंतु ते तिला हिस्सा देण्यास टाळाटाळ करत आहेत. पाच महिन्यांपूर्वी वयाच्या ५८ व्या वर्षी सासूने मुलाला जन्म दिल्याचा आरोप सुनेने केला असून असे मुद्दाम केल्याचे तिने आरोप केले आहेत.

मुलाला जन्म देण्यास सुनेचा आक्षेप होता

सुनेचे म्हणणे आहे की, तिला सासू-सासऱ्यांच्या मालमत्तेत वाटा हवा आहे, मात्र तिच्या वाट्याबाबत ते टाळाटाळ करत आहेत. यामुळेच वयाच्या 58 व्या वर्षी सासूने मुलाला जन्म देऊन नव्या वारसाला जन्म दिला आहे. आता संपूर्ण मालमत्ता मुलाच्या नावावर हस्तांतरित करायची आहे. यावर कौटुंबिक समुपदेशन केंद्राच्या प्रभारी नीलम राणा सांगतात की, त्यांना या प्रकरणी काहीही बोलायचे नाही. कौटुंबिक बाब आहे. मुलाच्या जन्मावर सुनेचा आक्षेप असला तरी यावर समुपदेशन केंद्राकडून काहीही बोलले जाऊ शकत नाही.

सासऱ्यांचे म्हणणे काय?

कौटुंबिक समुपदेशन केंद्रात समुपदेशनासाठी आलेल्या सासऱ्यांचे म्हणणे आहे की, सुनेला गावात राहण्यास सांगितले होते, मात्र ती तेथे राहण्यास तयार नाही. गावात त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. पण ती इथे न राहता माहेरी निघून गेली. यावर सून म्हणते की, सासू-सासरे तिला गावात राहायला सांगत होते, पण तिथे घरही बांधले गेलेले नव्हते. मग ती तिथे कशी राहू शकली असती? घर बांधले तर ती त्या वडिलोपार्जित मालमत्तेत राहण्यास तयार आहे. याबाबत दोन्ही बाजूंमध्ये कोणताही करार झालेला नाही. परंतु सासूने नव्या वारसाला जन्म देण्याच्या निर्णयावर समुदेशन केंद्रातील लोकांनी मत व्यक्त करणे टाळले आहे.

Web Title: Shocking as 58 years old mother in law delivered a baby boy when widow daughter in law was demanding property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.