दुस-या फेरी नंतर रावेरमध्ये रक्षा खडसे, जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 10:41 IST2024-06-04T10:38:43+5:302024-06-04T10:41:20+5:30
जळगाव मतदार संघात महायुतीचे स्मिता वाघ व रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे या दुसऱ्या फेरीत आघाडीवर आहे.

दुस-या फेरी नंतर रावेरमध्ये रक्षा खडसे, जळगावमध्ये स्मिता वाघ आघाडीवर
भूषण श्रीखंडे, जळगाव : जळगाव मतदार संघात महायुतीचे स्मिता वाघ व रावेर मधुन रक्षा खडसे या दुसऱ्या फेरीत आघाडीवर आहे. रक्षा खडसे यांना दुसऱ्या फेरीमध्ये ३६ हजार ३३२ मतांनी पुढे तर स्मिता वाघ ४३,४९६ मतांनी पुढे आहे.
जळगाव मतदार संघात पोस्टल मतमोजणीत करण पवार पुढे होते. त्यानंतर इव्हिएम मतमोजणीत पहिल्या व दुसऱ्या फेरीत चांगले मतदाधिक्य मिळत ४३ हजार ४९६ मतांनी पुढे आहे. तर रावेर मतदार संघात संघात पोस्टल मतमोजणीसह, पहिल्या व दुसऱ्या फेरीपासून रक्षा खडसे या चांगल्या मताधिक्यांनी पुढे आहेत.