दानवे फॅक्टर! जालन्यात भाजपची एकहाती सत्ता; ६५ पैकी ४१ जागांवर दणदणीत विजय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 14:32 IST2026-01-16T14:32:04+5:302026-01-16T14:32:20+5:30

Jalna Municipal Corporation Election 2026: शिवसेना १२, कांग्रेस ९ तर एमआयएमचा २ जागांवर विजय.

Jalna Municipal Corporation Election 2026: BJP moves towards majority in Jalna | दानवे फॅक्टर! जालन्यात भाजपची एकहाती सत्ता; ६५ पैकी ४१ जागांवर दणदणीत विजय...

दानवे फॅक्टर! जालन्यात भाजपची एकहाती सत्ता; ६५ पैकी ४१ जागांवर दणदणीत विजय...

Jalna Municipal Corporation Election 2026: प्रथमच होत असलेल्या जालना महानगरपालिका निवडणुकीतील मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरू झाली. मतमोजणीत दुपारी २ वाजेपर्यंत भाजपच्या २५ उमेदवारांचा विजय निश्चित झाला होता. तर, सायंकाळपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपने ४१ जागांवर दणदणीत विजय मिळवत, एकहाती सत्ता मिळवली आहे.

जालना महानगरपालिकेच्या १६ प्रभागातील ६५ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत गुरूवारी ६१.१६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर शुक्रवारी निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रारंभ झाला. 

पाच झोननुसार सहा टेबलांवर करण्यात आलेल्या मतमोजणीत प्रारंभीपासूनच भाजपने आघाडी घेतली होती. दुपारी २ वाजेपर्यंत भाजपच्या २५ उमेदवारांनी गुलाल उधळला होता. दिवसा अखेर भाजपने ४१, शिवसेना १२, कांग्रेस ९, एमआयएम २, तर एका अपक्षाने बाजी मारली आहे. 

युती तुटल्याने बदलली राजकीय समीकरणे

निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यात युती होण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र या बैठका निष्फळ ठरल्या आणि अखेर जालना महानगरपालिकेत भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांची युती तुटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मनसे यांची युती पाहायला मिळाली. महाविकास आघाडीतील घटक पक्षही स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत झाली. याशिवाय अनेक अपक्ष उमेदवारांनीही दिग्गज उमेदवारांना कडवी टक्कर दिली. 

Web Title : जालना नगर निगम चुनाव में भाजपा का दबदबा, पूर्ण बहुमत हासिल

Web Summary : जालना नगर निगम चुनावों में भाजपा ने शानदार जीत हासिल की, 65 में से 41 सीटें जीतीं। चुनाव से पहले गठबंधन टूट गए, भाजपा और शिवसेना ने स्वतंत्र रूप से चुनाव लड़ा। राकांपा (अजित पवार) ने मनसे के साथ गठबंधन किया। मतदान 61.16% रहा।

Web Title : BJP Dominates Jalna Municipal Elections, Securing Absolute Majority

Web Summary : BJP secured a landslide victory in the Jalna Municipal Corporation elections, winning 41 out of 65 seats. Alliances fractured before the election, with BJP and Shiv Sena contesting independently. NCP (Ajit Pawar) allied with MNS. Voter turnout was 61.16%.