विलास औताडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसची नूतन वसाहत भागात पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:53 IST2019-04-20T00:53:16+5:302019-04-20T00:53:37+5:30

जालना लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली नूतन वसाहत, विद्युत कॉलनी, कांचननगर, समर्थनगर भागात पदयात्रा काढण्यात आली होती.

Congress to campaign for Vilas Otade's footsteps in New Calcutta | विलास औताडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसची नूतन वसाहत भागात पदयात्रा

विलास औताडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसची नूतन वसाहत भागात पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली नूतन वसाहत, विद्युत कॉलनी, कांचननगर, समर्थनगर भागात पदयात्रा काढण्यात आली होती.
या पदयात्रेत अक्षय गोरंट्याल, विजय चौधरी, महावीर ढक्का, विनोद रत्नपारखे, अरुण मगरे, विजू कांबळे, मनोज गुढेकर, जॉर्ज उगले, अनिल कांबळे, दाविद गायकवाड, शिवराज जाधव, संजू जाधव, सुनील निर्मळ, आनंद लालझरे, संदीप खरात, संजय भगत शेख फारुख, अमीर पाशा, वैभव उगले, मोईस अन्सारी, इर्शाद कुरेशी, अन्वर मिर्झा आदींसह कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे पदाधिकारी- कार्यकर्ते सहभागी झाले होते. पदयात्रेत सहभागी युवकांनी कॉंग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्यांवर घोषणा दिल्या. गोरंट्याल यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या पदयात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करुन मतदारांनी औताडे यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
यावेळी विलास औताडे हे कसे सक्षम उमेदवार आहेत, देशात कॉंग्रेसचेच सरकार का आले पाहिजे, अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं पदाधिकारी मतदारांना समजावून सांगताना दिसत होते.

Web Title: Congress to campaign for Vilas Otade's footsteps in New Calcutta