"भारतात लोकसभा निवडणुका झाल्या की दोन देशातील संबंध सुधारतील"; पाकिस्तानी मंत्र्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 08:49 AM2024-04-02T08:49:45+5:302024-04-02T08:50:06+5:30

India Pakistan Relationship, Lok Sabha Election 2024: भारतात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर वातावरण कमालीचे तापलेले आहेत. पण तशातच पाकिस्तानकडून मात्र भारतातबाबत सकारात्मक गोष्टी बोलल्या जात आहे. 

India Pakistan relationship ties will improve after Lok Sabha Election 2024 claims pak defence minster | "भारतात लोकसभा निवडणुका झाल्या की दोन देशातील संबंध सुधारतील"; पाकिस्तानी मंत्र्याचा दावा

"भारतात लोकसभा निवडणुका झाल्या की दोन देशातील संबंध सुधारतील"; पाकिस्तानी मंत्र्याचा दावा

India Pakistan Relationship: भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. दोनही बाजुची नेतेमंडळी वेगवेगळे मुद्दे शोधून त्यावरून एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहेत. पण अशातच पाकिस्तानकडून मात्र एक सकारात्मक शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) पार पडल्या की त्यानंतर भारत-पाक राजकीय संबंध सुधारतील असा दावा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. भारतातील लोकसभा निवडणुकीनंतर भारतासोबतचे संबंध सुधारण्याची आशा त्यांनी इस्लामाबाद येथील संसद भवनाबाहेर आपले मत व्यक्त करताना व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले की, तेथील निवडणुकांनंतर भारतासोबतचे आमचे संबंध सुधारू शकतात.

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंधांना मोठा इतिहास आहे. पाकिस्तानला कायमचे संपूर्ण जगात दहशतवादाचे केंद्र म्हणून संबोधले जाते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्वातंत्र्यानंतर चार युद्धे झाली आहेत. पाकिस्तानला प्रत्येक युद्धात दारुण पराभव पत्करावा लागला आहे, तरीही ते अयशस्वी प्रयत्न करतच असतात. जवळपास सर्वच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानची नाचक्की झालेली आहे. तरीही भारताशी राजकीय संबंध सुधारण्याबाबत संरक्षण मंत्र्यांचे विधान काही सूचक संकेत देत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

पाकिस्तान भारताशी व्यापार सुरू करणार का?

पाकिस्तानच्या सीमेवर भारत, अफगाणिस्तान आणि इराण आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या बेकायदेशीर ताब्यामुळे पाकिस्तानला चीनच्या सीमेवरही तात्पुरता प्रवेश मिळाला आहे. चीन वगळता पाकिस्तानचा तिन्ही प्रमुख शेजारी राष्ट्रांशी संघर्ष सुरू आहे. अशा स्थितीत आसिफ यांना भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधात बदलाची आशा आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी सांगितले होते की, त्यांचा देश भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. निर्बंध असतानाही पाकिस्तान तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीने भारतीय वस्तू आयात करत आहे, त्यामुळे त्यांना जास्त किंमत मोजावी लागत आहे. यासंदर्भात सर्व पक्षांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले होते.

ख्वाजा आसिफ तालिबानवर नाराज

पाकिस्तानचा दावा आहे की आपल्या देशात अलीकडच्या काळात होत असलेल्या दहशतवादी कारवायांना अफगाणिस्तान जबाबदार आहे. अफगाणिस्तानातील तालिबान राजवटी तहरीक-ए-तालिबान (टीटीपी), पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देत असल्याचा आरोप सातत्याने करत आहे. यावर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह अफगाणिस्तानला भेट दिली आणि तेथील तालिबान सरकारला दहशतवाद रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची विनंती केली. तथापि, काबुलचा प्रस्तावित उपाय व्यावहारिकदृष्ट्या व्यवहार्य नव्हता असे पाकिस्तानचे मत आहे.

Web Title: India Pakistan relationship ties will improve after Lok Sabha Election 2024 claims pak defence minster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.