तलावात उडी घेऊन युवकाची आत्महत्या, देवरी येथील घटना
By अंकुश गुंडावार | Updated: September 26, 2023 12:33 IST2023-09-26T12:32:14+5:302023-09-26T12:33:28+5:30
आत्महत्येचे कारण अस्पष्ट

तलावात उडी घेऊन युवकाची आत्महत्या, देवरी येथील घटना
देवरी (गोंदिया) धूकेश्वरी मंदिर परिसरात असलेल्या पवन तलावात एका युवकाने सोमवारच्या रात्री उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव सागर राजनकर असे आहे.
प्राप्त माहितीनुसार देवरी येथील कुमार वाईन शॉप येथे काम करणारा युवक सागर राजणकर वय 26 याने सोमवारी रात्री 12 च्या दरम्यान धुकेश्वरी मंदिर परिसरातील पवन तलावात उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याअगोदर त्याने आपल्या घरच्या लोकांना सांगून तो घरून निघाला होता. त्याने तलावात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना रात्रीच उघडकीस आली होती. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी तलावातून काढण्यात आला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. देवरी पोलिसांनी मर्गं दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार करंजेकर करीत आहे.