रावणवाडी ते चांदसूरज रस्ता बांधकामासाठी राज्य सरकार निधीची तरतूद करणार काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:30 IST2024-12-18T16:27:26+5:302024-12-18T16:30:09+5:30

हेम प्रोजेक्ट अंतर्गत मंजूर रस्त्याला निधीची प्रतीक्षा : लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेण्याची गरज

Will the state government provide funds for the construction of the Rawanwadi to Chandsuraj road? | रावणवाडी ते चांदसूरज रस्ता बांधकामासाठी राज्य सरकार निधीची तरतूद करणार काय?

Will the state government provide funds for the construction of the Rawanwadi to Chandsuraj road?

विजय मानकर 
लोकमत न्यूज नेटवर्क 
सालेकसा :
आमगाव विधानसभा मतदारसंघात मागील दहा वर्षांत आमगाव देवरी राष्ट्रीय महामार्ग वगळता कोणत्याही प्रमुख रस्त्यांची पुनर्बाधणी झाली नाही. परिणामी सर्वत्र रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे अनेकांना अपघातात प्राण गमवावे लागले आहे. पक्के रस्ते तयार करण्यासाठी क्षेत्रातील नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी शासनाने रस्ते विकासासाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद केली. यात होम प्रोजेक्ट अंतर्गत मंजूर रावणवाडी-आमगाव- सालेकसा दरेकसा चांदसूरज मार्गासाठी निधी मिळेल काय असा सवाल केला जात आहे.


रावणवाडी-आमगाव- सालेकसा चांदसूरज मार्गाची पुनर्बाधणी शासनाच्या रस्ते वाहतूक विभागाच्या हेम प्रोजेक्ट (हायब्रीड एनुविटी मोडेल बेस्ड रोड प्रोजेक्ट) अंतर्गत करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच प्रक्रिया सुरु होईल असे आमदार विनोद अग्रवाल यांनी सालेकसा येथील रस्ते संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते. काही महिन्यांपूर्वी या मार्गाचा सव्र्व्हे करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु त्यानंतर लोकसभा मग विधानसभा निवडणुकीमुळे बराच कालावधी निघून गेला. यानंतर कुठल्याही हालचाली दिसून आल्या नाही. हा मार्ग हेम प्रोजेक्ट अंतर्गत आहे ही बाब वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग पण सांगत आहे. याचा डीपीआर सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करून दिला आहे. हेम प्रोजेक्ट अंतर्गत मार्ग तयार करण्यासाठी एमएसआरडीसी मंजुरी लागते. सध्या नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू असून, त्यात सरकारने पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्यात ३५ हजार कोटी मागण्या मान्य केल्या. यात राज्याच्या रस्ते व पुलाकरिता १५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यातून या मार्गासाठी निधी मिळाल्यास या मार्गाची समस्या दूर होईल. 


रस्ता बांधकामासाठी ३५० कोटी रुपयांची गरज 
हेम प्रोजेक्ट अंतर्गत रस्ते विकासासाठी एकूण लागणाऱ्या खर्चाचा ४० टक्के निधी केंद्राकडून दिला जातो. रावणवाडी-आमगाव-सालेकसा-चांदसुरज रस्ता बांधकामासाठी ३५० कोटी रुपयांची गरज आहे. यापैकी ६० टक्के निधी राज्य सरकारने दिले या रस्त्याचे काम मार्गी लागेल. यासाठी स्थानिक लोक- प्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. 


रस्त्याचे काम सुरु होईपर्यंत खड़े बुजवा 
हा रस्ता बांधकाम हेम प्रोजेक्टमध्ये घेतला असून, त्यात रस्ता बांधकामासाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच सरकारकडून मार्गासाठी निधी उपलब्ध होईल. या मार्गावर डांबरीकरण आणि जिथे आवश्यक असेल तिथे सिमेंटीकरण सुद्धा केले जाईल. यासाठी जवळपास ३०० ते ३५० कोटी रुपये निधीची गरज आहे. रस्त्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत संबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्याची मागणी सालेकसा येथील रस्ता संघर्ष समितीने केली आहे.

Web Title: Will the state government provide funds for the construction of the Rawanwadi to Chandsuraj road?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.