होळीला रंग खेळण्याआधी घ्या ही काळजी ! नैसर्गिक रंगांचा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:51 IST2025-03-06T16:44:30+5:302025-03-06T16:51:41+5:30

होळीला रंग खेळण्याआधी डोळे, त्वचेची काळजी घ्या : रासायनिक रंगांपासून बचाव करा

What to do after playing colors on Holi? Take care before the skin gets damaged | होळीला रंग खेळण्याआधी घ्या ही काळजी ! नैसर्गिक रंगांचा करा वापर

What to do after playing colors on Holi? Take care before the skin gets damaged

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
भारतात होळी हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी सर्वजण वेगवेगळे रंग चेहऱ्याला लावून आनंद साजरा करतात; पण कधीकधी या रंगांमुळे त्वचा, केस आणि डोळ्यांना त्रास होतो. यासाठी रंग खेळण्याआधीच आपला बचाव करावा, जेणेकरून डोळे व त्वचा खराब होणार नाही. 


होळीत विविध प्रकारचे केमिकल असलेले रंगही काही लोक वापरताना दिसतात. त्यामुळे अशा रंगाने त्वचा कोरडी पडणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, रंग त्वचेच्या आत जाऊन चेहरा काळपट दिसणे अशा अनेक समस्या उद्भवतात. त्यासाठी होळी खेळण्यापूर्वीच त्वचेवर नारळ तेलाने मालीश करावी, त्यातून त्या रंगाचा फारसा फरक आपल्या चहेऱ्यावर दिसणार नाही.


होळी खेळताना अनेकदा रंग डोळ्यात जातात आणि डोळ्यांची जळजळ होते. ती होऊ नये यासाठी होळी खेळताना चेहऱ्याला चष्मा लावणे गरजेचे आहे. होळी हा सण दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी हा रंगांचा खेळ आहे. लोक एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात; पण रंग खेळताना त्वचेची आणि केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. रंगाच्या हानिकारक परिणामांपासून त्वचा आणि केस सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. रंग आणि त्यातील रासायनिक द्रव्ये आणि त्यात उष्णता यामुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे होळीपूर्वी आणि होळीनंतर त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. होळीला रंग खेळल्यानंतर त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. रसायनिक युक्त रंगामुळे त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. क्लिंझरने चेहरा धुवा, चेहरा घासू नका.


रंग खेळण्याआधी काय काळजी घ्याल?
डोळे: होळी खेळताना अनेकदा रंग डोळ्यात जातात आणि डोळ्यांची जळजळ होते. ती होऊ नये यासाठी होळी खेळताना चेहऱ्याला चष्मा लावावा.
त्वचा : होळी खेळण्यापूर्वी संपूर्ण शरीरावर बॉडी लोशन लावावे. जेणेकरून त्वचेचे नुकसान होणार नाही. अनेकदा होळीच्या रंगामुळे केस कोरडे होतात. त्यामुळे होळी खेळायला जाण्यापूर्वी केसांना तेल लावावे.


रंग खेळल्यानंतर काय काळजी घ्याल?
थंड पाण्याने चेहरा धुवा. होळीला रंग खेळल्यानंतर त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा रसायनयुक्त रंगांमुळे त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. क्लिंझरने चेहरा धुवा. चेहरा घासू नका. थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही खोबरेल तेल किंवा मायसेलर पाण्याचा वापर करावे.


कोरफड लावा
रंग खेळल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी किंवा त्वचेवर लालसरपणा आला असेल तर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या. त्वचेला कोरफड जेल लावा, कॅमोमाइल चहानेसुद्धा चेहऱ्यावरील लालसरपणा दूर होऊ शकतो.


नैसर्गिक रंगांचा वापर करा
"केमिकल असलेले रंग वापरणे टाळावे. जितके नैसर्गिक रंग वापरता येतील तितके चेहरा, त्वचा, केसांचे नुकसान कमी होईल. नैसर्गिक रंगांनी होळी साजरी करणे आवश्यक आहे."
- मुकुंद धुर्वे, निसर्गमित्र


"रंग खेळण्यापूर्वी आणि रंग खेळल्यानंतर भरपूर पाणी प्या, त्वचा कोरडी होऊ नये म्हणून पाण्याचा जास्तीत जास्त वापर करा. होळीच्या पूर्वी आणि नंतर चेहऱ्यावर व्हिटॅमिन सी, हायलुरोनिक अॅसिड आणि नियासिनॅमाइड याशिवाय कोणतेही पदार्थ लावू नका."
- पूजा बोहरे, सखी, सौंदर्यप्रसाधन

Web Title: What to do after playing colors on Holi? Take care before the skin gets damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.