पोटात केसांचा गोळा बनवणारा मानसिक आजार; ट्राइकोफेगिया कशाने होतो ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:50 IST2025-06-06T17:49:47+5:302025-06-06T17:50:11+5:30
Gondia : मानसिक आरोग्य स्थितीमुळे जडतो धोकादायक विकार

What causes trichophagia, a mental illness that causes hairballs in the stomach?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ट्राइकोफेगिया ज्याला 'केस खाण्याचा आणि ओढण्याचा विकार' देखील म्हणतात, ही एक मानसिक आरोग्यस्थिती आहे. यामध्ये तुमच्या टाळू, भुवया किंवा शरीराच्या इतर भागांवरून केस उपटण्याची आणि खाण्याची वारंवार अदम्य इच्छा असते. तुम्ही या इच्छांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करू शकता; परंतु तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही. ही एक धोकादायक स्थिती असू शकते.
दुर्मीळ आजार; ताणतणाव, आघाताचा परिणाम
ट्राइकोफेगिया हा दुर्मीळ आजार आहे. यात रुग्ण आपले केस ओढून खात असतो. हा आजार ताणतणाव अधिक असेल तर होत असतो. तसेच मनावर एखादा आघात झाला असेल तर या आजाराला आमंत्रण दिले जाते.
ट्राइकोफेगिया ही मानसिक स्थिती
ट्राइकोफेगिया ही एक मानसिक स्थिती आहे. यामध्ये व्यक्ती आपले केस ओढून ते खात असते. यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरशी संबंधित वर्तनही आढळते
ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरमध्ये, व्यक्तीला वारंवार अवांच्छित विचार आणि भावना (वेड) आणि त्यातून निर्माण होणारे सक्तीचे वर्तन आढळते. हे विचार आणि सक्ती व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणतात आणि त्यांना त्रास देतात. ट्राइकोफेगियामध्येही ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरशी संबंधित वर्तन दिसते.
रुग्णास मळमळ, पोटदुखी, उलट्या
केस तोडून खाल्ल्यानंतर पोटात केसांचा गोळा निर्माण होऊ शकतो. यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. याशिवाय मळमळ होणे, पोटदुखी, उलट्याही होऊ लागतात.
पोटात होतो केसांचा गोळा
ट्राइकोफेगिया हा एक मानसिक आजार आहे. यामध्ये व्यक्ती आपले केस तोडून खात असते. गिळलेले केस पोटात जमा होऊ शकतात आणि ट्रायकोबेझोअर नावाचा एक मोठा केसांचा गोळा तयार करू शकतात.
"ट्राइकोफेगिया -ट्रायकोटेलोफिगा हा आजार मानसिक आहे. व्यक्तीला जास्त तणाव, आघात झाला असेल तर हा आजार जडतो. वेळीच यावर उपाय करणे आवश्यक आहे. अन्यथा व्यक्तीच्या जिवावर बेतते. औषधे, थेरपीने या आजारावर नियंत्रण आणले जाऊ शकते."
- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचारतज्ज्ञ