छत्तीसगडचे दोन पोलीस जवान नक्षल्यांच्या हल्ल्यात शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 11:13 IST2023-02-20T11:11:44+5:302023-02-20T11:13:45+5:30
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बोरतलाव येथील घटना

छत्तीसगडचे दोन पोलीस जवान नक्षल्यांच्या हल्ल्यात शहीद
गोंदिया : महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गंत आज (दि. 20) सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास 10-12 च्या संख्येत असलेल्या महिला पुरुष नक्षल्यांच्या टोळीने विनाशस्त्र चहा पिण्याकरीता गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला केला. या घातपाती हल्ल्यात दोन्ही पोलीस शहीद झाले. या घटनेनंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून जंगलात सर्चिंग सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारला बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह व ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चहा पिण्याकरीता पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर असलेल्या ढाब्याकडे गेले असता आधीच त्या परिसरात दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी यांच्यावर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिसरा जखमी असून जखमी शिपायामुळेच सदर घटना पोलिसांना कळल्याचे वृत्त आहे. दरम्यान नक्षल्यांनी मोटारसायकलला आग लावून घटनास्थळावरुन पोबारा केला.