शिकाऊ डॉक्टरचा रुग्ण तरुणीवर बलात्कार; गोंदिया तालुक्यातील घटनेने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 18:07 IST2022-03-15T17:29:09+5:302022-03-15T18:07:31+5:30
गोंदिया तालुक्यातील रजेगाव ग्रामीण रुग्णालयात पाच ते सहा शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करतात. यापैकी एका डॉक्टरने त्याच रुग्णालयात रुग्ण म्हणून दाखल झालेल्या २२ वर्षांच्या तरुणीवर अत्याचार केला.

शिकाऊ डॉक्टरचा रुग्ण तरुणीवर बलात्कार; गोंदिया तालुक्यातील घटनेने खळबळ
गोंदिया : एमबीबीएसची पदवी घेतल्यावर ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या २६ वर्षांच्या डॉक्टरने २२ वर्षीय रुग्ण तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली.
१५ मार्चच्या सकाळी ६.३० वाजता रजेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात ही घटना घडली. हडमक डोंगराम माली (२६, रा. रमेश कॉलनी, सांचूर, राजस्थान) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.
गोंदिया तालुक्यातील गिरोला दासगाव येथील २२ वर्षाची तरुणी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे दाखल झाली होती. या रुग्णालयात गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस करणारे विद्यार्थी पदवी घेतल्यानंतर शिकाऊ डॉक्टर म्हणून विविध रुग्णालयात जाऊन आपली सेवा देतात.
गोंदिया तालुक्यातील रजेगाव ग्रामीण रुग्णालयात पाच ते सहा शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करतात. यापैकी एक हडमक डोंगराम माली (२६) याने त्याच रुग्णालयात रुग्ण म्हणून दाखल झालेल्या २२ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केला. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी आरोपीवर भादंविच्या कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहेत.