डबलचीनला ‘बाय-बाय’, फेस योगाने मिळवा परफेक्ट लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:50 IST2025-06-16T17:49:12+5:302025-06-16T17:50:23+5:30

फेस योगा : सौंदर्य आणि ताजेपणासाठी प्रभावी उपाय

Say goodbye to double chin, get the perfect look with face yoga! | डबलचीनला ‘बाय-बाय’, फेस योगाने मिळवा परफेक्ट लूक!

Say goodbye to double chin, get the perfect look with face yoga!

माधुरी परमार
गोंदिया :
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चेहऱ्याच्या स्नायूंना ताणून, स्क्ताभिसरण सुधारून त्वचेला लवचिकपणा आणि चमक देणारी फेस योगा ही नैसर्गिक पद्धत आहे. फेस योगा आपण जाणून घेणार आहोत.


आहार आणि स्किनकेअर

  • अधिक पाणी घ्या. ताजी फळे आणि भाज्या खा.
  • संतुलित आहार आणि योग्य स्किनकेअर वापरा.
  • व्हिटॅमिन सी, ए. प्रोटीनयुक्त अन्न त्वचेसाठी चांगले आहे.
  • फेस योगा आणि घरगुती उपायांमुळे त्वचेला नैसर्गिक चमक देता येते.


फेस योगाचे फायदे

  • चेहऱ्याच्या स्नायूंवर ताण देऊन झुऱ्या आणि लहान रेषा कमी होतात.
  • नियमित फेस योगामुळे त्वचेला ताजेपणा आणि तरतरी मिळते.
  • चेहऱ्याच्या स्नायूंवर व्यायाम केल्याने डबलचीन कमी होऊ शकतो.
  • चेहऱ्याच्या रक्ताभिसरणामुळे त्वचा अधिक चमकदार दिसते.


त्वचेला ताजेपणा, मिळेल आता तरतरी

  • व्ही पोज : भुवयांवर मिडल फिंगर्स ठेवा आणि बाहेरच्या कोपरांवर इंडेक्स फिंगर्स ठेवा. हलक्या हाताने त्वचा ओढा.
  • फायदे : गालांच्या सुरकुत्या कमी होतात, डोळ्यांभोवतीचा ताण कमी होतो.
  • फिश फेस : गाल आणि ओठ आत वळवा आणि १० सेकंद याच स्थितीत ठेवा.
  • फायदे : गालांचा टोन वाढवतो आणि ओठांचे स्नायू मजबूत करतो.
  • चीक लिफ्टर : गालांचे हाड वरील दिशेने ओढा आणि हसत राहा.
  • फायदे : गालांचा लवचिकपणा आणि ताजेपणा वाढवतो.
  • ऑ रिलीझ : तोंड मोठे उघडा आणि जबंडा वर-खाली हलवा.
  • फायदे : डबलचीन कमी होती, जबड्याचा ताण निघतो.
  • लायन ब्रेथ : श्वास आत घ्या आणि सिंहासारखा आवाज काढत जीभ बाहेर काढा.
  • फायदे : चेहऱ्याला आराम मिळतो आणि ताजेतवाना होतो. 
  • फायदे : चेहऱ्याला आराम मिळतो आणि ताजेतवाना होतो.
  • घरेलू फेसपॅक : एक चमचा मध, एक चमचा
  • दही आणि अर्धा चमचा गुलाबजल मिसळून फेसपॅक तयार करा. १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून कोमट पाण्याने धुऊन टाका.
  • फायदा: हा पॅक ताचा हायड्रेट करतो आणि ताजेपणा आणतो.

Web Title: Say goodbye to double chin, get the perfect look with face yoga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.