गोंदियात अवकाळी पावसाची हजेरी, वातावरण बदललं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 21:46 IST2021-02-16T21:45:26+5:302021-02-16T21:46:02+5:30
जिल्ह्याच्या लगत असलेल्या मध्यप्रदेशातील शिवणी जिल्ह्यात मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गारपीट झाली. त्यानंतर रात्री ९.३५ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

गोंदियात अवकाळी पावसाची हजेरी, वातावरण बदललं
गोंदिया : हवामान विभागाने १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. मंगळवारी रात्री ९.३५ दरम्यान पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील काही भागात तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला.
जिल्ह्याच्या लगत असलेल्या मध्यप्रदेशातील शिवणी जिल्ह्यात मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गारपीट झाली. त्यानंतर रात्री ९.३५ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर अवकाळी पावसामुळे धान खरेदी केंद्रावर उड्यावर असलेल्या धानाला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.