पोलिसाला धमकावले, बाप - लेकावर गुन्हा दाखल
By नरेश रहिले | Updated: October 6, 2023 16:24 IST2023-10-06T16:23:57+5:302023-10-06T16:24:22+5:30
खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी

पोलिसाला धमकावले, बाप - लेकावर गुन्हा दाखल
गोंदिया : साखरीटोला येथील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांना बापलेकाने धमकावल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता घडली.
मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासोबत अतिक्रमण काढण्याकरिता पोलीस शिपाई हेमंत योगेश कटरे हे गेले होते. पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी दिलेले आदेशावरून ते बंदोबस्ताकरिता गेले असताना आरोपी संतोष मदनलाल अग्रवाल (५३) व कुणाल संतोष अग्रवाल (२५) दोन्ही रा. साखरीटोला यांनी पोलीस कर्मचाऱ्याला धमकावून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यांना खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली. या घटने संदर्भात सालेकसा पोलिसांनी भादंविच्या कलम ३५३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.