Gondia | सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू; देवरी तालुक्यातील घटना

By अंकुश गुंडावार | Updated: September 8, 2022 16:32 IST2022-09-08T16:28:13+5:302022-09-08T16:32:29+5:30

उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Farmer woman dies of snakebite in dewri tehsil | Gondia | सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू; देवरी तालुक्यातील घटना

Gondia | सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू; देवरी तालुक्यातील घटना

लोहारा (गोंदिया) : शेतात काम करीत असताना महिलेला सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.८) सकाळी ११ वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील मुल्ला येथे घडली. सविता जयेन्द्रं कुथीर (४०) रा.मुल्ला असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे. 

सध्या खरीप हंगामातील धान पिकांवर किटकनाशक फवारणीचे कामे सुरू आहेत. सविता कुथीर ही महिला गुरुवारी सकाळी त्यांच्या शेतातील काम करण्यासाठी गेली होती. काम करीत असतानाच तिला पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला. त्या महिलेने शेतात काम करीत असलेल्या मजुरांना ही बाब सांगितली. त्यांनी लगेच याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली.

कुटुंबीय व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लगेच त्यांच्या शेतावर पोहचत सविताला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सविताच्या मृत्यूने मुल्ला गावात शोककळा पसरली आहे. मृतक शेतकरी महिलेच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Farmer woman dies of snakebite in dewri tehsil