वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By अंकुश गुंडावार | Updated: July 19, 2024 18:54 IST2024-07-19T18:52:45+5:302024-07-19T18:54:08+5:30
Gondia : सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास जमुनिया येथे घडली घटना

Farmer dies due to lightning
तिरोडा (गोंदिया) : शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील जमुनिया येथे घडली. हंसराज टेकनलाल पटले (४४) असे वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील जमुनिया येथील शेतकरी हंसराज पटले यांच्या शेतात शुक्रवारी रोवणीसाठी ट्रॅक्टरने चिराटा मारण्याचे काम सुरू होते. यावेळी ते सुद्धा शेतात काम करीत होते. सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, शेतात काम करीत असलेल्या हंसराज पटले यांच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा जागेवर मृत्यू झाला. शेतात काम करीत असलेल्या मजुरांनी यांची माहिती पटले यांच्या कुटुंबीय व पोलिस पाटील यांना दिली. पोलिस पाटलांनी तलाठी आणि तिरोडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. हंसराज पटले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढावले आहे.