सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेवून शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:36 IST2025-02-10T16:35:19+5:302025-02-10T16:36:06+5:30

Gondia : शेतकऱ्यावर होते बँकेचे कर्ज

Farmer commits suicide by hanging himself due to persistent crop failure and debt | सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेवून शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer commits suicide by hanging himself due to persistent crop failure and debt

गोरेगाव : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी गोरेगाव तालुक्यातील मोहगाव बुद्रुक येथे घडली. देवेंद्र भजनलाल पटले (४५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. 
 

प्राप्त माहितीनुसार मोहगाव बुद्रुक येथील शेतकरी देवेंद्र पटले हे ९ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजतापासून कुणालाही न सांगता घरून निघून गेले होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला दिवसभर पण त्यांचा पत्ता लागला नाही. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास देवेंद्रचा मृतदेह शेजारी असलेल्या खाली घरातील आळ्याला गळफास लावल्याच्या स्थितीत आढळला. देवेंद्र वर बँकेचे कर्ज होते. त्याच कर्जाला कंटाळूनच देवेंद्रने आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे. देवेंद्र यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी आई असा मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Farmer commits suicide by hanging himself due to persistent crop failure and debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.